IND vs SA : ‘माझा रेकॉर्ड मोडायला तुला…’; Virat Kohli याच्या शतकानंतर सचिन तेंडुकरचं ट्विट, नेमकं काय म्हणाला!

Sachin Tendulkar twit after virat century : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने 49 शतक करक इतिहास रचला आहे. सचिन तेंडुलकर याच्या वन डे मधील शतकांची बरोबरी केलीये. त्यानंतर सचिनने ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

IND vs SA : माझा रेकॉर्ड मोडायला तुला...; Virat Kohli याच्या शतकानंतर सचिन तेंडुकरचं ट्विट, नेमकं काय म्हणाला!
| Updated on: Nov 05, 2023 | 7:55 PM

मुंबई : वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यामध्ये भारताने पहिल्यांदा बॅटींग करताना 327 धावांचा आव्हान दिलं आहे. भारताकडून विराट कोहली याने शतक करत इतिहास रचला आहे. या सामन्यामध्ये विराटने नाबाद 101 धावांची खेळी केली. या शतकासह विराटने सचिन तेंडुलरकरच्या वन डे मधील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. कोहलीने विक्रमाची बरोबरी केल्यानंतर सचिन तेंडुलकर याने ट्विट केलं आहे.

विराट कोहली याने 49 व्या शतकाला गवसणी घातल्यावर सचिनने त्याच अभिनंदन केलं आहे. सचिनने याबाबत ट्विट केलं असून विराटला त्याचा विक्रम 50 वं शतक करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने खूप वर्षांआधी एक भविष्यवाणी केली होती. त्यावेळी त्याने माझाा विक्रम मोडला तर ते विराट कोहली आणि रोहित शर्मा असतील असं म्हटलं होतं. आज विराटने त्याच्या वन डे मधील सर्वाधिक शतकांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

वाढदिवसा दिवशी भारताकडून शतक करणारा विराट कोहली तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी विनोद कांबलीने 1993 मध्ये इंग्लंडविरूद्ध नाबाद १०० धावा केल्या होत्या. दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर याने १९९८ ला ऑस्ट्रेलियाविरूद्ध १३४ धावा केल्या होत्या. या यादीमध्ये विराटने एन्ट्री मारली असून वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शतक केलं आहे.

 

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी