सांगलीतील 425 एसटी कर्मचारी बेस्ट बससेवेसाठी मुंबईत, 106 जणांना कोरोनाची बाधा

सांगली जिल्ह्यातील तब्बल 106 एसटी कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. (Sangli 106 ST Worker tested Corona Positive) 

सांगलीतील 425 एसटी कर्मचारी बेस्ट बससेवेसाठी मुंबईत, 106 जणांना कोरोनाची बाधा

सांगली : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील तब्बल 106 एसटी कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात चालक आणि वाहकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सांगली विभागातून बेस्ट उपक्रमासाठी काही कामगार हे मुंबईला गेले होते. त्यानंतरच या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे. (Sangli 106 ST Worker tested Corona Positive)

मुंबईत बेस्ट बसची सेवा देण्यासाठी सांगलीतून 200 चालक, 200 वाहक आणि इतर 25 असे एकूण 425 कर्मचारी मुंबईला गेले होते. दहा दिवसांची सेवा दिल्यानंतर ते सांगलीत परतले. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

या चाचणीत तब्बल 106 एसटी कामगारांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कोरोनाची बाधा झालेल्या कामगारांमध्ये सांगली 6, मिरज 6, इस्लामपूर 6, विटा 14, आटपाडी 15, जत 15, कवठेमहांकाळ 14, तासगाव 24 आणि शिराळा विभागातील 6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांवर कोव्हिड सेंटर, रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. (Sangli 106 ST Worker tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

Mirzapur 2 मध्ये केवळ अश्लीलता आणि हिंसा; राजू श्रीवास्तव भडकले, OTT वर सेन्सॉरची मागणी

Sangli Corona : सांगलीने करुन दाखवलं, एकाच कुटुंबातील 25 रुग्ण कोरोनामुक्त

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI