AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Boat Overturn : सांगली बोट दुर्घटना : बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला, बोट पलटली, नेमकं काय झालं?

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना ब्रह्मनाळ या गावात बोट उलटून (Boat Overturn) 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.ही बोट 30 जणांना घेऊन जात होती, त्यावेळी ही दुर्घटना झाली.

Sangli Boat Overturn : सांगली बोट दुर्घटना : बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला, बोट पलटली, नेमकं काय झालं?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 08, 2019 | 6:01 PM
Share

Sangli Boat Overtrun सांगली :  सांगलीमध्ये महापूर (Sangli Flood) आल्यामुळे थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना ब्रह्मनाळ या गावात बोट उलटून (Brahmanal Boat Overturn) 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही बोट 30 जणांना घेऊन जात होती, त्यावेळी ही दुर्घटना झाली. बुडालेली बोट ग्रामपंचायतीची असल्याचं सांगण्यात येत आहे.

सांगलीतील 4 तालुक्यांना पुराचा वेढा आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पाणी शिरलं होतं. त्यामुळे या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. बोटीची क्षमता 17 जणांची असताना या बोटीत 30 जण बसले होते. त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

नदीपात्रापासून दीड किलोमीटरपर्यंत 15 फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. ब्रह्मनाळमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होतं. ब्रह्मनाळ आणि वसगडे या गावांचा प्रवास ग्रामपंचायतीची  नावेने केला जातो.  वर्षभर इथली वाहतूक अशाच पद्धतीने होते. पुरामुळे या भागात सध्या वीजेचे खांब, मोठ मोठी झाडं शेंड्यापर्यंत बुडाली आहेत. त्यामुळे नेमकी बोट कुठल्या दिशेने न्यायची हेच लक्षात आलं नसावं. ग्रामपंचायतीच्या  बोटीतून नेहमी वाहतूक होत असली तरी पुराच्या पाण्याने मार्ग समजण्यास अडथळा येत होता.

मंदीर, झाड, कठडे पाहून अंदाजाने मार्गक्रमण सुरु होते. त्यावेळी बुडालेल्या झाडाच्या फांदीला बोट लागली आणि ती क्षणात पलटी झाली. कोणाकडेही लाईफ जॅकेट नव्हतं. खासगी बोटीत तशी व्यवस्थाच नव्हती. नियमित सवयीप्रमाणे ही बोट नेली जात होती. 

पाण्याची स्थिती इतकी भीषण आहे की बोट पलटी होताच अनेक जण वाहून गेले. मोठी झाडं पाण्यात गेलेत, वीजेचे खांब पाण्यात गेलेत त्यामुळे जायचं कुठं हेच कळत नव्हतं.  बुडालेल्या झाडाच्या फांदीने घात केला आणि बोट पलटली.

या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 9 मृतदेह हाती लागले आहेत तर 5 जणांचा शोध सुरु आहे.

तहसिलदारांची प्रतिक्रिया

बोटीच्या पंखात कचरा अडकल्यामुळे बोट उलटली, अशी प्राथमिक माहिती आहे, असं पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सांगितलं. संबंधित बोट ग्रामपंचायतीची असून ती नियमितपणे प्रवासासाठी वापरली जात असल्याचंही पोळ यांनी सांगितलं.

कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अजूनही वाढ होत आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 56 फूट 8 इंचावर गेली आहे.

सांगली जिल्ह्यातील 70 हजार नागरिक आणि 21 हजार जनावरं स्थलांतरित करण्यात आली आहेत. 21 हजार 500 हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. भारतीय सैन्य आणि एनडीआरएफच्या टीमकडून अजूनही बचावकार्य सुरुच आहे.

एनडीआरएफच्या आणखी दोन टीम आणि कोस्टगार्डच्या दोन टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. गरज भासल्यास जिल्ह्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या 

सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू 

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा