सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना अटक

| Updated on: May 17, 2020 | 9:17 PM

तहसीलदाराला मारहाण केल्या प्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना अटक
Follow us on

सांगली : तहसीलदाराला मारहाण केल्या प्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Double Maharashtra Kesari Chandrahar Patil) यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना चांद्रहार पाटील यांनी मारहाण (Double Maharashtra Kesari Chandrahar Patil) केली होती.

चंद्रहार पाटील यांच्या अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करत विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी साडेसात लाखाचा दंड ठोठावला होता. या वाळू गाड्यांवर ठोठावलेला दंड कमी करा, अशी मागणी अनेक दिवसापासून चंद्रहार पाटील करत होते. मात्र तहसीलदार यांनी सर्व दंड भरा अशा सूचना दिल्या होत्या.

हा राग मनात धरुन चंद्रहार पाटील यांनी 3 मे रोजी तहसील आवारातच तहसीलदांराना आणि त्यांच्या एका साथीदाराला मारहाण केली होती.

नेमकं प्रकरण काय?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार ऋषिकेश शेळके आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये इन्सीडेंट कमांडर म्हणून कर्तव्य बजावत होते. दरम्यान, 7 एप्रिल 2020 रोजी महसूल विभागाच्या पथकाने कराड रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ 2 वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केली. या दोन्ही वाळूच्या डंपरला प्रत्येकी 3 लाख 71 हजार 365 असा एकूण 7 लाख 72 हजार 730 रुपयांचा दंड ठोठावला होता. या दंडाची प्रत चंद्रहार पाटील याला देण्यात आली होती. त्यानंतर 1 मे 2020 रोजी चंद्रहार पाटील (Double Maharashtra Kesari Chandrahar Patil) यांनी तहसील कार्यालयात येवून तुम्ही मला एवढा दंड का केला? असा प्रश्न करत दंड रद्द करण्याची आणि वाहने सोडून देण्याची मागणी केली. त्यावेळी तहसीलदार शेळके यांनी चंद्रहार पाटील यांना कोर्टात रितसर अपील करण्यास सांगितले. तसेच, मी दंड रद्द करु शकत नाही, असं स्पष्ट केलं. त्यावेळी चंद्रहार पाटील यांनी ‘मी तुम्हाला बघून घेतो’, अशी धमकी दिल्याची माहिती तहसीलदार शेळके यांनी आपल्या तक्रारीत दिली.

त्यानंतर 3 मे रोजी तहसील आवारात दुपारी तहसीलदार ऋषिकेश शेळके आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे हे विटा शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड सेंटरची पाहणी करण्यासाठी निघाले होते. ते सरकारी वाहनात बसत असतानाच चंद्रहार पाटील यांनी एका साथीदारासह येऊन हल्ला केला. त्यांनी तहसीलदार शेळके यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी चंद्रहार पाटील याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चंद्रहार पाटील यांनी त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर याप्रकरणी ऋषिकेश शेळके यांनी पोलिसांत तक्रार (Double Maharashtra Kesari Chandrahar Patil) दाखल केली होती.

संबंधित बातम्या :

अंगणात खेळणाऱ्या मुलांचं भांडण, मोठ्यांचा हस्तक्षेप, सावत्र भावाची कुऱ्हाडीने हत्या

Lockdown | लॉकडाऊनदरम्यान कसाबसा गावी पोहोचला, क्वारंटाईन केलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पोटच्या मुलीचं आजारपण असह्य, बीडमध्ये बापाने चिमुरडीला गळा दाबून संपवलं

बीडमध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या