वाळू तस्करीच्या कारवाईचा राग, सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी पैलवानाकडून तहसीलदारांवर हल्ला

वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्याच्या रागातून सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी पैलवानाने थेट तहसीलदारांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Attack on Government Officer during Lockdown).

वाळू तस्करीच्या कारवाईचा राग, सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी पैलवानाकडून तहसीलदारांवर हल्ला
Follow us
| Updated on: May 03, 2020 | 11:13 PM

सांगली : वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्याच्या रागातून सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी पैलवानाने थेट तहसीलदारांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Attack on Government Officer during Lockdown). आरोपी पैलवान चंद्रहार पाटील याने तहसील कार्यालयाच्या आवारामध्येच विट्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना मारहाण केली. ही घटना आज (3 मे) दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा विटा तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदारांना झालेल्या मारहाणीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी विटा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार ऋषीकेत शेळके आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये इन्सीडेंट कमांडर म्हणून कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान 7 एप्रिल 2020 रोजी महसूल विभागाच्या पथकाने कराड रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ 2 वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केली. या दोन्ही वाळूच्या डंपरला प्रत्येकी 3 लाख 71 हजार 365 असा एकूण 7 लाख 72 हजार 730 रुपांचा दंड ठोठावला होता. या दंडाची प्रत आरोपी पैलवान चंद्रहार पाटील याला देण्यात आली होती. त्यानंतर 1 मे 2020 रोजी चंद्रहार पाटील याने तहसील कार्यालयात येवून तुम्ही मला एवढा दंड का केला? असा प्रश्न करत दंड रद्द करण्याची आणि वाहने सोडून देण्याची मागणी केली. त्यावेळी तहसीलदार शेळके यांनी आरोपीला कोर्टात रितसर अपील करण्यास सांगितले. तसेच मी दंड रद्द करु शकत नाही असं स्पष्ट केलं. त्यावेळी आरोपीने मी तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिल्याची माहिती तहसीलदार शेळके यांनी आपल्या तक्रारीत दिली आहे.

आज दुपारी तहसीलदार ऋषीकेत शेळके आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे हे विटा शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड सेंटरची पाहणी करण्यासाठी निघाले होते. ते सरकारी वाहनात बसत असतानाच आरोपी चंद्रहार पाटील याने एका साथीदारासह येऊन हल्ला केला. त्याने तहसीलदार शेळके यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी चंद्रहार पाटील याला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने त्यांनाही मारहाण करत ढकलून दिले. तहसील कार्यालय आवारातच भरदिवसा तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्याना मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर चंद्रहार पाटील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील गेटमधून पळून पसार झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबूले यांनी तात्काळ विटा पोलिस ठाण्यास भेट दिली. तिथे प्रांताधिकारी शंकर बर्गे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांची भेट घेवून घटनेची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांना तपासाबाबत सूचना दिल्या. कोरोनाच्या महासंकटात कर्तव्यावर असलेले तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोपी पैलवान चंद्रहार पाटील याच्या शोधासाठी पोलिसांनी 3 पथके तयार केली असून आरोपीचा शोध सुरु आहे.

दरम्यान याप्रकरणी विटा पोलिसांत तहसीलदार ऋषिकेत शेळके  यांनी तक्रार दाखल केली. यात आरोपीवर संचारबंदी आदेशाचा भंग करुन तहसील कार्यालयात येवून सरकारी कामात अडथळा आणून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके करत आहेत.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात 2115 जण कोरोनामुक्त, एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजार 974 वर

Navi Mumbai Corona : नवी मुंबईत एकाच दिवसात 25 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 300 पार

‘नागरिकांना रुग्णालयात बेड नाहीत, दुसरीकडे जा म्हणून सांगितलं जातंय’, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात जीवनावश्यक नसलेल्या दुकानांना सशर्त परवानगी, मुंबई-पुण्यातील निर्बंध कायम

Attack on Government Officer in Satara during Lockdown

Non Stop LIVE Update
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.