AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt Lung Cancer | संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे

Sanjay Dutt Lung Cancer | संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता
| Updated on: Aug 12, 2020 | 12:19 AM
Share

मुंबई : अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे (Sanjay Dutt Diagnosed With Lung Cancer). संजय दत्त काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तो रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर रुग्णालयातून दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, आता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती आहे (Sanjay Dutt Diagnosed With Lung Cancer).

उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता

कर्करोगाच्या उपचारासाठी संजय दत्त अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेत त्याच्यावर उपचार होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळेच पुढचे काही दिवस संजय दत्त शूटिंग आणि सोशल मीडियापासून दूर राहणार आहे.

दरम्यान, याबाबत संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबियांकडून आतापर्यंत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. उद्या अधिकृत माहिती दिली जाऊ शकते.

संजय दत्तची पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलं सध्या दुबईत आहेत. संजय दत्तच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे. त्यावर उपचार होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उपचारासाठी संजयला तातडीने अमेरिकेला जावं लागेल.

संजय दत्तने मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. “मित्रांनो काही वैद्यकीय उपचारांसाठी मी नेहमीच्या कामातून ब्रेक घेत आहे. माझ्यासोबत माझे कुटुंबिय आणि मित्र परिवार आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चांवर विश्वास ठेवून चिंतेत पडू नका, एवढेच माझे हितचिंतकांना सांगणे आहे. तुमच्या प्रेम आणि सदिच्छांमुळे मी लवकरच परतेन”, असे या पोस्टमध्ये संजय दत्तने म्हटलं होते (Sanjay Dutt Diagnosed With Lung Cancer).

संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्तला रविवारी (8 ऑगस्ट) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्याला रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने अवघ्या दोनच दिवसात (10 ऑगस्ट) संजयला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयात दाखल असतानाही संजय दत्तने ट्वीट करत त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली होती.

“मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी प्रकृती ठीक आहे. मी सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे आणि माझा कोव्हिड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांची मदत आणि शुश्रुषेमुळे मी एक-दोन दिवसांत घरी येईन, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद”, असे ट्वीट संजय दत्तने रुग्णालयात दाखल असताना (8 ऑगस्ट)  केले होते.

संजय दत्तचा ‘पानिपत’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता तो ‘सडक 2’, ‘शमशेरा’, ‘भुज’, ‘केजीएफ’, ‘पृथ्वीराज आणि तोरबाज’ अशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कोरोनामुळे काही चित्रपटांच्या शूटिंगला ब्रेक लागला होता.

संजय दत्तच्या ‘सडक 2’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी (11 ऑगस्ट) प्रदर्शित होणार होता. मात्र, त्याचं प्रदर्शन मंगळवारी टाळण्यात आलं.

संबंधित बातम्या :

Sanjay Dutt | अभिनेते संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.