Ayodhya Ram Mandir | बाबरी मशिदीवरुन ओवेसींचे ट्वीट, तर संजय राऊत यांच्या फोटोतून भावना

Ayodhya Ram Mandir | बाबरी मशिदीवरुन ओवेसींचे ट्वीट, तर संजय राऊत यांच्या फोटोतून भावना

अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजनाआधी संजय राऊत यांनी फोटो शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनिश बेंद्रे

|

Aug 05, 2020 | 10:38 AM

मुंबई : ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. भूमिपूजनाआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनीही बाबरी मशिदीवरुन ट्वीट केले आहे. (Sanjay Raut and Asaduddin Owaisi tweets before Ayodhya Ram Mandir Bhumipoojan)

मंदिराच्या घुमटावर “श्रीराम – बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती” असे लिहिलेला फोटो संजय राऊत यांनी शेअर केला आहे. त्याखाली “गर्व से कहो हम हिंदू है” असेही लिहिले आहे. अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती असल्याच्या भावना राऊतांनी याआधीही अनेकदा बोलून दाखवल्या आहेत.

“बाबरी पाडली त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. या कृतीनं बाळासाहब ठाकरे हिंदूह्रदयसम्राट बनले. आजही ते स्थान अढळ आहे. सगळ्याच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून राममंदिर उभे राहत आहे. या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसणारे रामद्रोही ठरतील. राममंदिर भूमीपूजनाच्या प्रश्नाने राजकारणही कायमचे संपावे. श्रीरामाचीही तीच इच्छा असेल, सारा देश आज एकसुरात गर्जत आहे”, असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. (Sanjay Raut and Asaduddin Owaisi tweets before Ayodhya Ram Mandir Bhumipoojan)

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओ शेअर करत अयोध्येतील पवित्र मातीला शत शत प्रणाम केले आहेत.

दुसरीकडे, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनीही भूमिपूजनाच्या दिवशी सकाळीच ट्वीट केले. “बाबरी मशीद होती, आहे आणि राहील, इन्शाल्लाह” असे ओवेसींनी लिहिले आहे.

(Sanjay Raut and Asaduddin Owaisi tweets before Ayodhya Ram Mandir Bhumipoojan)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें