गुन्हेगाराला भेटायला तुरुंगात जाता, अर्णव तुमचा कोण लागतो?, संजय राऊतांचा भाजप नेत्यांना सवाल

| Updated on: Nov 13, 2020 | 11:57 AM

गुन्हेगाराला भेटायला तुरुंगात जातात. अर्णव यांचा कोण लागतो?", असा जळजळीत सवाल संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना विचारला. (Sanjay Raut Attacked Bjp over Arnab Goswami)

गुन्हेगाराला भेटायला तुरुंगात जाता, अर्णव तुमचा कोण लागतो?, संजय राऊतांचा भाजप नेत्यांना सवाल
Follow us on

मुंबई :  “शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते अन्वय नाईक यांच्या आत्महत्येबाबत बोलत नाहीत. मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेलं त्याबाबत बोलत नाहीत. मात्र गुन्हेगाराला भेटायला तुरुंगात जातात. अर्णव यांचा कोण लागतो?”, असा जळजळीत सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना विचारला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज राऊतांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आरोप फेटाळून लावत सोमय्या तसंच भाजप नेत्यांवर टीकेची तोफ डागली. (Sanjay Raut Attacked Bjp over Arnab Goswami)

“शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते अन्वय नाईक यांच्या आत्महत्येबाबत का बोलत नाहीत? शेठजींच्या पक्षातल्या लोकांचा भंपकपणा आणि खोटारडेपणा सिद्ध होतो, अशी टीका राऊत यांनी केली. किरीट सोमय्या हे गिधाडासारखे पेपर घेऊन फडफडतायत, त्यांनी कितीही फडफडू द्या, आमचं सरकार 5 वर्ष चालणार, भाजपच्या अशा सवयीमुळेच त्यांना घरी बसवलंय,” असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

“मराठी माणसाच्या आत्महत्येवर न बोलता या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांची तुरुंगात जाऊन शेठजींच्या पक्षाची लोकं भेट घेतात. त्यांनी पहिल्यांदा सांगावं की अर्णव त्यांचा कोण लागतो”, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसंच “अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपींना भाजपला वाचवायचं आहे”, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना नाईक आणि ठाकरे परिवारामध्ये व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “कोणत्या जमिनीचे व्यवहार?, कोण आहे हा माणूस? त्यांनी सरळ सरळ व्यवहार दाखवावेत, असं चॅलेंज राऊत यांनी दिलं.

“एखाद्या आरोपीला वाचवायच्या हेतूने अलिबागला जाऊन त्याची भेट घेण्याचा प्रयत्न करणं त्यापेक्षा मराठी ताईच्या कुंकवाला न्याय देण्यासाठी झटा”, असा सल्ला राऊतांनी भाजप नेत्यांना दिला. (Sanjay Raut Attacked Bjp over Arnab Goswami)

संबंधित बातम्या

शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते फालतू फडफड करतायत, संजय राऊतांचा सोमय्यांना निर्वाणीचा इशारा