Bollywood Drug Connection | सारा अली खान गोव्याहून मुंबईला परतली, परवा एनसीबी चौकशी करणार

चित्रिकरणानिमित्ताने आई अभिनेत्री अमृता सिंहसोबत गोव्यात असणाऱ्या साराला एनसीबीचा समन्स मिळताच ती तडक मुंबईत परतली आहे. (Sara Ali khan Return Mumbai after NCB Summons)

Bollywood Drug Connection | सारा अली खान गोव्याहून मुंबईला परतली, परवा एनसीबी चौकशी करणार

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव आल्याने एनसीबीने अभिनेत्री सारा अली खानलाही (Sara Ali Khan) समन्स बजावला होता. चित्रिकरणानिमित्ताने आई अभिनेत्री अमृता सिंहसोबत (Amruta Singh) गोव्यात असणाऱ्या साराला एनसीबीचा समन्स मिळताच ती तडक मुंबईत परतली आहे. मुंबई विमानतळावर पत्रकारांना बघून साराने आपला चेहरा झाकून घेतला. यावेळी तिच्यासोबत आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहीम अली खानदेखील गोव्याहून परतले आहेत. (Sara Ali khan Return Mumbai after NCB Summons)

सारा अली खान व्यतिरिक्त अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), रकुलप्रीत सिंग (RakulPreet Singh)आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही एनसीबीने समन्स बजावले आहेत. 26 सप्टेंबर रोजी श्रद्धा कपूरसोबत सारा अली खानची ही चौकशी होणार आहे. आज (24 सप्टेंबर) एनसीबीने सिमॉन खंबाटाची चौकशी केली.

दीपिका पदुकोण मुंबईत दाखल

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने (NCB) समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण दुपारी मुंबईत दाखल झाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने उद्या (25 सप्टेंबर) दीपिकाला चौकशीसाठी बोलावणे धाडले आहे. तिचा पती अभिनेता रणवीर सिंहही वकिलांची जुळवाजुळव करत आहे. (Sara Ali khan Return Mumbai after NCB Summons)

दीपिका पदुकोण आज (24 सप्टेंबर) दुपारी दीड वाजता मुंबईत परतली आहे. खाजगी चार्टर्ड विमानाने दीपिका गोव्याहून मुंबईला आली आहे. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर दीपिका सर्वात आधी वरळीतील ब्योमाँड टॉवरमध्ये असलेल्या आपल्या घरी जाऊन, त्यानंतर पुढे काय करायचे हे ठरवणार आहे.

दरम्यान, एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात दोन एफआयआर नोंदविल्या आहेत, त्यापैकी एफआयआर क्रमांक 15/20 अंतर्गत  दीपिका पदुकोण चौकशी केली जाणार आहे. तर याच एफआयआर अंतर्गत एनसीबी रकुल प्रीत सिंगही चौकशी करेल. दुसरी एफआयआर क्रमांक 16/20 अंतर्गत सारा अली खान आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांची चौकशी केली जाणार आहे. गुरुवारी (24 सप्टेंबर) सिमॉन खंबाटाची चौकशी केली जात आहे. तर, 25 सप्टेंबरला दीपिका पदुकोण, रकुलप्रीत सिंह आणि सिमॉन खंबाटा यांच्यासह आता क्षितीज प्रसादचीही चौकशी केली जाणार आहे. यानंतर शनिवारी, 26 सप्टेंबरला सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची चौकशी होणार आहे.

संबंधित बातम्या :

ड्रग्ज प्रकरणात ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे नाव, निर्माता क्षितीज प्रसादला एनसीबीचा समन्स

karan Johar Party Video : आता करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, ‘शिरोमणी’च्या आमदाराची NCB कडे तक्रार

Bollywood Drugs Case | अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांना एनसीबीचा समन्स

 

(Sara Ali khan Return Mumbai after NCB Summons)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI