नववी ते बारावीसाठी 3 तास, ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षण विभागाकडून प्रस्ताव तयार, मुख्यमंत्र्यांकडून अद्याप शिक्कामोर्तब नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय सरकारने (Online education learning Proposal) घेतला आहे.

नववी ते बारावीसाठी 3 तास, ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षण विभागाकडून प्रस्ताव तयार, मुख्यमंत्र्यांकडून अद्याप शिक्कामोर्तब नाही
Follow us
| Updated on: Jun 12, 2020 | 8:25 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिवसभरातून तीन तास ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शिक्षण विभागाकाडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला आहे. (Online education learning Proposal)

शिक्षण खात्याने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या प्रस्तावानुसार, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि दुसऱ्या वर्षाच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार नाही. तर तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना एका तासासाठी ऑनलाईन शिक्षण दिले जाईल. तर पाचवी-सहावीच्या मुलांनी दोन तास ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल.

त्याशिवाय नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना तीन तास ऑनलाईन शिक्षण दिलं जाणार आहे. राज्य सरकार लवकरच याबाबतचे निर्देश जारी करणार आहे.

सध्या याबाबतचा प्रस्ताव शिक्षण मंडळाकडून मुख्यमंत्र्यांच्या मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहेत. या प्रस्तावावर अंतिम मंजूरी मिळाल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शैक्षणिक वर्ष सुरु झालेच पाहिजे असे निर्देश दिले होते. “आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरु करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरु करा. तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे. कोरोनासारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.

“गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी,” असेही ते यावेळी म्हणाले होते.  (Online education learning Proposal)

संबंधित बातम्या : 

जूनमध्ये शालेय वर्ष सुरु झालेच पाहिजे, मुख्यमंत्री आग्रही, ऑनलाईन-ऑफलाईन शिकवणी

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी लर्निंग फ्रॉम होम, शासनाकडून ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरु

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.