Corona | महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४ वर

महाराष्ट्रात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे (Second Corona Victim death in Mumbai). मुंबईत 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Corona | महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४ वर
Follow us
| Updated on: Mar 22, 2020 | 12:02 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे (Second Corona Victim death in Mumbai). मुंबईत 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण पंधरा दिवसांअगोदर सुरत येथून आला होता. त्याला 19 मार्च रोजी मुंबईतील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यानच रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे याअगोदर 17 मार्च रोजी मुंबईच्या कस्तूरबा रुग्णालयात 64 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी मुंबईतच दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत 6 तर पुण्यात 4 अशा नव्या रुग्णांची वाढ

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वेगान वाढत आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल 12 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज पुन्हा 10 नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. या 10 पैकी 6 रुग्ण मुंबईतले आहेत. तर 4 रुग्ण पुण्यातील आहेत.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 74 वर

महाराष्ट्रात कोरोना फोफावत चालला आहे. राज्यात कोरानाबाधित रुग्णांचा आकडा आता 74 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे (Second Corona Victim death in Mumbai). महाराष्ट्रात कालपर्यंत कोरोनाबाधितरुग्णांची संख्या 64 होती, मात्र आज ही संख्या 74 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबईत (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई महिला (1) – 19 मार्च उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च एकूण – 74 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च महाराष्ट्र – 56 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च एकूण – 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

संबंधित बातम्या :

Maharashtra corona | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 64 वर, मुंबईत 8, पुण्यात 2 नवे रुग्ण

Reduce AC use | एसीचा वापर कमी करा, आरोग्य मंत्र्यांचा सल्ला, दिवसभरात 11 नवे कोरोना रुग्ण

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.