AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इम्रान खानची इज्जत काढणाऱ्या अफगाणी भाईजानचा दुसरा व्हिडीओ

मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रत्युउत्तराच्या इशाऱ्यानंतर, त्यांची खिल्ली उडवणाऱ्या अफगाणी नागरिकाने, आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या भारतीय वायूसेनेचे बहादूर पायलट अभिनंदन वर्धमान (Abhinandan return) हे पाकिस्तानातून  भारताच्या वाटेवर आहेत. आज ते भारतात येत आहेत. त्यांच्या शौर्याला केवळ भारतीयच नाही तर अफगाणिस्तानातील नागरिकही सलाम करत आहेत. त्याचवेळी ते पाकिस्तानची खिल्लीही […]

इम्रान खानची इज्जत काढणाऱ्या अफगाणी भाईजानचा दुसरा व्हिडीओ
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रत्युउत्तराच्या इशाऱ्यानंतर, त्यांची खिल्ली उडवणाऱ्या अफगाणी नागरिकाने, आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या भारतीय वायूसेनेचे बहादूर पायलट अभिनंदन वर्धमान (Abhinandan return) हे पाकिस्तानातून  भारताच्या वाटेवर आहेत. आज ते भारतात येत आहेत. त्यांच्या शौर्याला केवळ भारतीयच नाही तर अफगाणिस्तानातील नागरिकही सलाम करत आहेत. त्याचवेळी ते पाकिस्तानची खिल्लीही उडवत आहेत.

हसत हसत पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या ‘अफगानी भाईजानने’ (AFGHAN BHAIJAAN,) आणखी एक व्हिडीओ अपलोड केला आहे. मागील व्हिडीओत पाकिस्तानला जोरदार जोडे लगावणाऱ्या ‘अफगानी भाईजानने’ यावेळी मोलाचा सल्ला दिला. तसंच विंग कमांडर अभिनंदन यांना सलाम केला.

वाचा: इम्रान खानची भारताला धमकी, अफगाणी नागरिकांनी पाकची अब्रू काढली

या व्हिडीओ ‘अफगानी भाईजान’ म्हणतो, “जो आपलं शीर न झुकवता पाकिस्तानात गेला, असा माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. हा माणूस कोणत्या मातीचा बनला आहे? असा माणूस आमच्या देशात जन्माला यायला हवा होता. त्यांच्या डोळ्यात ना पाणी आहे, ना भीती, दुश्मन देशातही स्वत:च्या घरात वावरल्याप्रमाणे राहतो. अशा माणसाला माझा सलाम. ज्या वाघिणीसारख्या मातेने अशा मुलाला जन्म दिला, तिलाही सलाम”

दुसरीकडे ‘अफगानी भाईजानने’ पाकिस्तानला सल्ला दिला. दुसऱ्या देशांकडून भीक मागून जमवलेले पैसे आत्मघाती हल्लेखोरांवर खर्च करु नका, असं ‘अफगानी भाईजानने’ म्हटलं.

यूट्यूबवर अफगान भाईजान नावाचं यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर अफगानी नागरिक पाकिस्तानची खिल्ली उडवताना दिसतो. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकवरही अफगानिस्तानी नागरिकांनी आनंद व्यक्त केला होता. शिवाय इम्रान खान यांना टोमणेही मारले होते.

VIDEO:

इम्रान खानची भारताला धमकी, अफगाणी नागरिकांनी पाकची अब्रू काढली

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.