VIDEO : अमिताभचा फोटो पाहून रेखा पाहा काय म्हणाली….!

VIDEO : अमिताभचा फोटो पाहून रेखा पाहा काय म्हणाली....!

मुंबई : बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेखा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रेखा बिग बी अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून बाजूला होताना दिसतात. फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर इव्हेंटदरम्यान हा प्रकार घडला.  रेखा  फोटोग्राफर्सना पोज देत होत्या, त्याचवेळी त्यांनी मागे वळून पाहिलं असता, त्यांना बॅकग्राऊंडला अमिताभ यांचा फोटो दिसतो आणि त्या तातडीने तिथून बाजूला निघून जातात.

व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

This is hilarious ????? #rekha reaction posing next to #amitabhbachchan picture at the #DABBOORATNANICALENDAR launch @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अमिताभ आणि रेखा यांची जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी होती. या दोघांच्या नात्याबद्दल सर्वांना सर्वश्रृत आहे. बऱ्याच वर्षांपासून या दोघांच्या नात्याबद्दल सर्वत्र बोललं जातं. मात्र यावर आजपर्यंत अमिताभ आणि रेखाने बोलणं टाळलं आहे. दोघांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट केले आहेत.

डब्बू रत्नानीच्या कार्यक्रमात रेखा मनमोकळेपणे फोटोग्राफर्सना पोज देत होत्या. मात्र अचानक रेखा अमिताभ यांचा फोटो पाहून तिथून बाजूला गेल्या. यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडिया आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये रेखा आणि अमिताभवर चर्चा सुरु झाली आहे.

‘सिलसिला’ हा अमिताभ आणि रेखा यांचा शेवटचा चित्रपट आहे. त्यानंतर दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही. आतापर्यंत अनेकदा दोघांच्या नात्यांबद्दल वृत्तपत्रातून, मॅगझीनमधून काही गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र दोघांनी कधी आपल्या नात्याबद्दल कबुली दिली नाही. आजही अनेक चाहते त्या दोघांना एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी इच्छुक आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI