Corona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार

बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार (Corona Vaccine Update) आहे.

Corona Vaccine | कोरोना लस 225 रुपयांना उपलब्ध होणार, सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाऊंडेशनसोबत 10 कोटी डोसचा करार
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने कोरोना व्हायरस लस विकसित करणाऱ्यांना सांगितलं आहे की, प्रायोगिक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी किमान दोन महिन्यांचा सुरक्षितता डेटा आवश्यक असणार आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ते त्यांच्या लसीसाठी मान्यता देतील असं कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे.

पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर कहर केला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकडे लागल्या आहेत. अशा परिस्थितीत सिरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे आता सिरमची कोरोना लस साधारण 225 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. (Corona Vaccine Update)

सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाउंडेशनबरोबर महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूट तब्बल 100 मिलियन डोस तयार करणार आहे.

भारताबरोबर मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये डोस दिले जाणार आहे. या लसीच्या एका डॉलरची किंमत ही तीन डॉलर असणार आहे. जगातील तब्बल 92 देशांमध्ये ही लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढविण्यात येईल. या माध्यमातून जास्तीत जास्त गरजवंतांना फायदा देण्याचा प्रयत्न आहे. (Corona Vaccine Update)

संबंधित बातम्या : 

लुटालूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर धाडी टाका, राज्य सरकारकडून भरारी पथकं तैनात

खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI