AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून सध्या शाहरुख सिनेमांपासून दूर!

शाहरुख सध्या कुठलाही सिनेमा करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. शाहरुख सिनेमांपासून दूर का आहे, याचं कारण आता समोर आलं आहे. शाहरुखजवळ अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तरी त्याने अजून कुठलाही सिनेमा हाती घेतलेला नाही. कारण, सध्या त्याला त्याचा संपूर्ण वेळ त्याच्या मुलांबरोबर घालवायचा आहे, असं खुद्द किंग खानने सांगितले.

...म्हणून सध्या शाहरुख सिनेमांपासून दूर!
| Updated on: Jun 24, 2019 | 5:13 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान गेल्या अनेक काळापासून सिनेमांपासून दूर आहे. शाहरुख खानने ‘झिरो’ या सिनेमानंतर अजूनही कुठला सिनेमा साईन केलेला नाही. एकीकडे शाहरुखचे चाहते त्याला लवकरात लवकर पुन्हा एकदा मोठ्या पद्यावर पाहू इच्छितात. मात्र, शाहरुख सध्या कुठलाही सिनेमा करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. शाहरुख सिनेमांपासून दूर का आहे, याचं कारण आता समोर आलं आहे. शाहरुखजवळ अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तरी त्याने अजून कुठलाही सिनेमा हाती घेतलेला नाही. कारण, सध्या त्याला त्याचा संपूर्ण वेळ त्याच्या मुलांबरोबर घालवायचा आहे, असं खुद्द किंग खानने सांगितले.

View this post on Instagram

Little one was a bit confused between ‘Boating’ and Voting, so took him along to experience the difference.

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

“माझ्याजवळ सध्या कुठलाही सिनेमा नाही. मी कुठल्याही प्रोजेक्टवर काम करत नाही. एक सिनेमा संपला की आपण लगेच दुसरा सिनेमा हाती घेतो. सध्या मला कामापासून दूर राहायचं आहे. आता मला सिनेमे पाहाणे, कहाणी ऐकणे आणि जास्तीत जास्त पुस्तकं वाचण्यासाठी माझा वेळ द्यायला हवा, असं मला वाटतं. माझी मुलगी आता कॉलेजात आहे आणि मुलाचं शिक्षण पूर्ण होणार आहे. त्यामुळे मला माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या कुटुंबाला देण्याची गरज आहे”, असं शाहरुखने फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

View this post on Instagram

Another sweet picture from AbRam’s birthday party… #fathersloveoverload

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

शाहरुख खान हा अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनपटात काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र, शाहरुखने स्वत: ही बातमी फेटाळली. तसेच, शाहरुख हा लवकरच दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या सिनेमात दिसणार असल्याचीही चर्चा होती. शाहरुख आणि राजकुमार हिराणी हे दोघेही मिळून या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचंही बोललं जात होतं. मात्र, शाहरुखच्या वक्तव्यानंतर सध्यातरी तो कुठलाही सिनेमा करत नसल्याचं स्पष्ट होतं. म्हणजे आपल्या आवडत्या किंग खानला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी त्याच्या चाहत्यांना बराच काळ वाट पाहावी लागणार आहे.

‘झिरो’ हा शाहरुखचा शेवटचा सिनेमा होता. हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर हवा तितका चालला नाही. त्यामुळे आता शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्या पुढील सिनेमाची प्रतिक्षा आहे.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.