रिलीज होताच शाहरुखचा ‘झिरो’ लीक

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याचा बहूप्रतिक्षीत ‘झिरो’ हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. या सिनेमाची शाहरुख चाहत्यांना खूप काळापासून प्रतिक्षा होती. तर शाहरुखसाठीही हा सिनेमा अतिशय महत्त्वाचा ठरला, कारण या सिनेमात शाहरुखने एका ठेंगण्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. या सिनेमापासून शाहरुख आणि सिनेमाच्या दिग्दर्शकांना खूप अपेक्षा आहेत. मात्र झिरो सिनेमाच्या पहिल्याच दिवशी त्याला पायरेसीचे […]

रिलीज होताच शाहरुखचा ‘झिरो’ लीक

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याचा बहूप्रतिक्षीत ‘झिरो’ हा सिनेमा आज प्रदर्शित झाला. या सिनेमाची शाहरुख चाहत्यांना खूप काळापासून प्रतिक्षा होती. तर शाहरुखसाठीही हा सिनेमा अतिशय महत्त्वाचा ठरला, कारण या सिनेमात शाहरुखने एका ठेंगण्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. या सिनेमापासून शाहरुख आणि सिनेमाच्या दिग्दर्शकांना खूप अपेक्षा आहेत. मात्र झिरो सिनेमाच्या पहिल्याच दिवशी त्याला पायरेसीचे ग्रहण लागले आहे.

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, ‘झिरो’ सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. या सिनेमाच्या डाऊनलोड लिंक्स तामिळरॉक्स, फिल्मीवॅप, फनीफिझ यांसारख्या वेबसाईट्सवर उपलब्ध आहेत. त्याशिवाय सोशल मीडियावर काही फेक अकाऊंट्सवरुन या सिनेमाचे काही सिन्सही लीक केले जात आहेत. तर अनेक फेक अकाऊंट्सवरुन या सिनेमावर प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.

पायरेसीचा निशाना ठरलेला ‘झिरो’ हा काही पहिला सिनेमा नाही, तर याआधीही अनेक चित्रपटांना या पायरेसीच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘2.0’ ही यातून सुटलेला नाही. तसेच, 2018 मधील ‘पद्मावत’, ‘टायगर जिंदा हैं’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’, ‘बाघी-2’, ‘पॅड मॅन’, ‘रेड’, ‘हेट स्टोरी-4’, ‘परी’, ‘फुकरे रिर्टन्स’, ‘ऐय्यारी’ हे काही महत्त्वाचे सिनेमे देखील पायरेसीच्या विळख्यातून सुटलेले नाही.

दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘झिरो’ सिनेमात शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भुमिकेत आहेत. यात शाहरुख एका ठेंगण्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे, अनुष्का यात एका अपंग वैज्ञानिकाच्या भुमिकेत आहे, तर कतरिना ही एका व्यसनी सुपरस्टारची भूमिका साकारते आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळतो आहे. हा सिनेमा आनंद एल. रायच्या ‘कलर यलो प्रोडक्शन’ आणि गौरी खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’च्या बॅनरखाली बनला आहे.

शाहरुख, अनुष्का आणि कतरिना यांचा सोबतचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी या दोघांनी ‘जब तक हैं जान’ या सिनेमात काम केले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI