तुळजाभवानी आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने वाचलो : ओमराजे निंबाळकर

ओमराजे (Shiv sena MP Omraje Nimbalkar knife attack) यांच्या हातावर वार झाल्याने ते जखमी झाले आहेत. चक्क खासदारावर हल्ला झाल्याने उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

तुळजाभवानी आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने वाचलो : ओमराजे निंबाळकर
सचिन पाटील

|

Oct 16, 2019 | 1:53 PM

उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर (Shiv sena MP Omraje Nimbalkar knife attack) यांच्यावर चाकूने खुनी हल्ला झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथं ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ओमराजे (Shiv sena MP Omraje Nimbalkar knife attack) यांच्या हातावर वार झाल्याने ते जखमी झाले आहेत. चक्क खासदारावर हल्ला झाल्याने उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया

मी नायगावची सभा आटोपून आलो होतो. माझ्यासोबत कार्यकर्ते होते. समोर मॉब होता. समोरुन एक मुलगा आला, त्याने नमस्कार केला आणि थेट चाकूने वार केला. तो वार चुकवण्यासाठी मी डावा हात आडवा घातला. त्यामुळे डाव्या हातावर वार बसला, हातातील घड्याळावर वार बसला. डाव्या हाताला लागलं. मी सुखरुप आहे. पोटात वगैरे दुखापत झाली नाही.

तुळजाभवानी आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने मी वाचलो. हल्लेखोर अजिंक्य टेकाळे कोण आहे, त्याला ओळखत नाही. माझ्या सभेत दारु पिऊन माणसं पाठवायचं, गोंधळ घालायचा हे तीन दिवसांपासून हे सुरु आहे.

जो मुलगा आहे, त्याच्या चौकशीतून मास्टरमाईंड समोर येईल, जे काय  सत्य असेल ते बाहेर येईल.

माझ्या वडिलांच्या बाबतीत 2006 मध्ये असंच घडलं. वैचारिक वाद विचारानेच सोडवायला हवेत, जी काही लढाई असेल ती विचाराने लढावी. विरोधकांना माझं काहीही आव्हान नाही. मॉबमध्ये कोण दुष्मन, कोण दोस्त कळत नाही. त्यामुळे अशा मॉबमध्ये कोणीही काहीही करु शकतं. माझ्याजवळ पोलीस असले तरी ते काय करु शकणार? असं ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.

नेमका हल्ला कसा झाला?

एका खासदारावर थेट चाकू हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. ओमराजे प्रचार सभास्थळी पोहोचून गाडीतून उतरले. तेव्हा त्यांच्याजवळ एक तरुण आला आणि त्याने निंबाळकरांच्या हातात हात दिला आणि दुसऱ्या हाताने त्याने चाकू काढत निंबाळकरांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला.हल्लेखोराने पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र पवनराजेंनी हात अडवा धरल्यामुळे हातावर चाकूचा वार झाला.

प्रचारसभेदरम्यान गर्दीचा फायदा घेत ओमराजे निंबाळकरांवर हल्ला झाला. हात मिळवण्याच्या बहाण्याने हल्लेखोर ओमराजेंजवळ गेला. त्यावेळी त्याने चाकू काढला आणि ओमराजेंवर हल्ला केला. माथेफिरुने खासदार ओमराजेंवर तब्बल तीन वार केले. पवनराजेंच्या हातातील घड्याळावर चाकूचे वार बसले. घड्याळाच्या बाजूला हातावरही वार बसले.  वार चुकल्यानंतर माथेफिरु पळून गेला. या चाकू हल्ल्यात ओमराजे निंबाळकर जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या 

BREAKING – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला  

पोटात खुपसण्यासाठी हल्लेखोराने चाकू उगारला, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर तीन वार   

तुळजाभवानी आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने वाचलो : ओमराजे निंबाळकर  

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें