AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर (Shiv sena MP Omraje Nimbalkar knife attack) यांच्यावर चाकूने खुनी हल्ला झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथं ही  धक्कादायक घटना घडली.

BREAKING - शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 31, 2019 | 8:21 AM
Share

उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर (Shiv sena MP Omraje Nimbalkar knife attack) यांच्यावर चाकूने खुनी हल्ला झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथं ही  धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ओम राजे यांच्या हातावर वार झाल्याने ते जखमी झाले आहेत. चक्क खासदारावर हल्ला झाल्याने उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्यावर दिवसा ढवळ्या चाकूहल्ला झाला. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचे काही वर्षापूर्वी हत्या झाली होती. ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते पद्मसिंह पाटील घराण्याचे टोकाचे वैर आहेत.

ओमराजे निंबाळकर 2019 मध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा खासदार झाले. त्यांनी पद्मसिंह पाटलांचे सुपुत्र राणा जगजीत सिंह पाटील यांचा पराभव केला होता. ओमराजे हे 2009 मध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. त्यानंतर त्यांना शिवसेनेने 2019 मध्ये लोकसभेचं तिकीट दिलं आणि ते निवडून आले.

नेमका हल्ला कसा झाला?

एका खासदारावर थेट चाकू हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. ओमराजे प्रचार सभास्थळी पोहोचून गाडीतून उतरले. तेव्हा त्यांच्याजवळ एक तरुण आला आणि त्याने निंबाळकरांच्या हातात हात दिला आणि दुसऱ्या हाताने त्याने चाकू काढत निंबाळकरांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला.हल्लेखोराने पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र पवनराजेंनी हात अडवा धरल्यामुळे हातावर चाकूचा वार झाला.

प्रचारसभेदरम्यान गर्दीचा फायदा घेत ओमराजे निंबाळकरांवर हल्ला झाला. हात मिळवण्याच्या बहाण्याने हल्लेखोर ओमराजेंजवळ गेला. त्यावेळी त्याने चाकू काढला आणि ओमराजेंवर हल्ला केला. माथेफिरुने खासदार ओमराजेंवर तब्बल तीन वार केले. पवनराजेंच्या हातातील घड्याळावर चाकूचे वार बसले. घड्याळाच्या बाजूला हातावरही वार बसले.  वार चुकल्यानंतर माथेफिरु पळून गेला. या चाकू हल्ल्यात ओमराजे निंबाळकर जखमी झाले आहेत.

ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया

मी नायगावची सभा आटोपून आलो होतो. माझ्यासोबत कार्यकर्ते होते. समोर मॉब होता. समोरुन एक मुलगा आला, त्याने नमस्कार केला आणि थेट चाकूने वार केला. तो वार चुकवण्यासाठी मी डावा हात आडवा घातला. त्यामुळे डाव्या हातावर वार बसला, हातातील घड्याळावर वार बसला. डाव्या हाताला लागलं. मी सुखरुप आहे. पोटात वगैरे दुखापत झाली नाही.

तुळजाभवानी आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने मी वाचलो. हल्लेखोर अजिंक्य टेकाळे कोण आहे, त्याला ओळखत नाही. माझ्या सभेत दारु पिऊन माणसं पाठवायचं, गोंधळ घालायचा हे तीन दिवसांपासून हे सुरु आहे.

जो मुलगा आहे, त्याच्या चौकशीतून मास्टरमाईंड समोर येईल, जे काय  सत्य असेल ते बाहेर येईल.

माझ्या वडिलांच्या बाबतीत 2006 मध्ये असंच घडलं. वैचारिक वाद विचारानेच सोडवायला हवेत, जी काही लढाई असेल ती विचाराने लढावं. विरोधकांना माझं काहीही आव्हान नाही. मॉबमध्ये कोण दुष्मन, कोण दोस्त कळत नाही. त्यामुळे अशा मॉबमध्ये कोणीही काहीही करु शकतं. माझ्याजवळ पोलीस असले तरी ते काय करु शकणार? असं ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.

कोण आहेत ओमराजे निंबाळकर

  • ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे पवनसिंह राजे निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत.
  • पवनसिंह आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यातील टोकाचे राजकीय आणि कौटुंबिक वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.
  • 2004 मध्ये या दोघांमध्ये उस्मानाबाद विधानसभेसाठी लढत झाली होती. अटीतटीच्या लढतीत डॉ. पद्मसिंह पाटील 484 मतांनी विजयी झाले होते.
  • पवनराजेंच्या हत्येनंतर 2009 मध्ये शिवसेनेने त्यांचे चिरंजीव ओमराजेंना विधानसभेची उमेदवारी दिली.
  • या लढतीत त्यांनी पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर मात केली होती. त्यापुढील 2014 च्या निवडणुकीत मात्र राणा पाटील यांनी पराभवाची परतफेड केली.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा ओमराजे विरुद्ध राणा जगजीतसिंह यांच्यात लढत झाली. त्यात पुन्हा ओमराजे निंबाळकर यांनी बाजी मारली.

निंबाळकर विरुद्ध पाटील

राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली होती. ओमराजे निंबाळकर युवा सेनेचे राज्य सचिव आहेत. पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ. पाटील आणि ओमराजे निंबाळकर असा सत्तासंघर्ष सुरु आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी डॉ. पाटील यांचा तेरणा साखर कारखानासह विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव करत डॉ. पाटील यांच्या सत्ता साम्राज्याला सुरुंग लावला होता. कोणत्याही निवडणुका असल्या की हा संघर्ष अटळ असतो.

संबंधित बातम्या 

BREAKING – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला  

पोटात खुपसण्यासाठी हल्लेखोराने चाकू उगारला, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर तीन वार   

तुळजाभवानी आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने वाचलो : ओमराजे निंबाळकर  

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत