वाशिमला पावसानं झोडपलं, 75 हजार हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान

जिल्हाला तीन दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं आहे. खरिप हंगामातील पिकं काढणीला आली असताना पाऊस सुरू झाला. 75 हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आहे. Soyabeen Crop Loss in Washim

वाशिमला पावसानं झोडपलं, 75 हजार हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 4:47 PM

वाशिम: जिल्हाला तीन दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं आहे. खरिप हंगामातील पिकं काढणीला आली असताना पाऊस सुरू झाला. 75 हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी कापूस गळून पडला आहे. पावसामुळं सोंगून ठेवलेलं सोयाबीन, भाजीपाला, तूर, कापसासह फळ बागांनाही फटका बसला आहे. हवामान विभागानं पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.  (Soyabeen crop loss due to rain in washim on 75 thousand hector land)

विदर्भात सोयाबीन म्हणजे पिवळे सोनं समजलं जातं. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव,रिसोड, मानोरा, मंगरुळनाथ,कारंजा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच तडाखा दिला. यामुळे कापणीला आलेले आणि कापणी करुन ठेवलेल्या 75 हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी परतीच्या पावसामुळं कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. कपाशीचे बोंड खाली पडले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वातावरणातील बदलामुळे पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.

वाशिममध्ये फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील राजुरा, मुंगळा, मोरगव्हान, एकलासपूर, सह अनेक गावातील संत्रा बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे लाखों रुपयाचे होणार उत्पन्न हातचे गेल्यानं फळबाग उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत.

पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी हैराण झाला झाला आहे. हजारो हेक्टरवरील उभ्या सोयाबीन ला अंकुर फुटले तर शेतात पाणी साचल्यानं शेकडो हेक्टरवरील सोयाबीन सडलं आहे. शेतकऱ्यांनी काढलेलं सोयाबीन पीक शेतातून घरी नेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. कृषी विभागाने व विमा कंपनीने पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Rain LIVE | राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडला

उस्मानाबादमध्ये दोन पाझर तलाव फुटले, नागरिकांचे स्थलांतर, एअर लिफ्टिंगची व्यवस्था

(Soyabeen crop loss due to rain in washim on 75 thousand hector land)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.