AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मीरप्रश्नी बोलताना इम्रान खान यांनी अटलजींची आठवण सांगितली!

इस्लामाबाद : काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा उपाय नाही, चर्चेतूनच प्रश्न सुटू शकतो, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मांडले. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकारांशी इम्रान खान यांनी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काश्मीरप्रश्नासह विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. अटलजी म्हणाले होते…. काश्मीर प्रश्न सुटू शकतो का, असे पत्रकारांनी इम्रान खान यांनी विचारले असता, […]

काश्मीरप्रश्नी बोलताना इम्रान खान यांनी अटलजींची आठवण सांगितली!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM
Share

इस्लामाबाद : काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा उपाय नाही, चर्चेतूनच प्रश्न सुटू शकतो, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मांडले. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकारांशी इम्रान खान यांनी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काश्मीरप्रश्नासह विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. अटलजी म्हणाले होते…. काश्मीर प्रश्न सुटू शकतो का, असे पत्रकारांनी इम्रान खान यांनी विचारले असता, त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या चर्चेचा प्रसंग सांगितला. “भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नटवर सिंग यांनी मला एकदा सांगितले होते की, जनरल मुशर्रफ यांच्या कार्यकाळात काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याच्या ते अगदी जवळ आले होते. म्हणजेच, काश्मीर प्रश्नावर नक्कीच काहीतरी व्यावहारिक उपाय निघू शकतो.” असे म्हणत इम्रान खान यांनी आशा व्यक्त केल्या.

दोन-तीन मार्ग आहेत… जोपर्यंत चर्चा होत नाही, तोपर्यंत काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी इतर पर्यायांचा विचार होऊ शकत नाही, असेही इम्रान खान म्हणाले. ज्यावेळी उपस्थित पत्राकारांनी त्यांना काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी पर्यायांची विचारणा केली, तर ते म्हणाले, “दोन-तीन मार्ग आहेत, ज्यावर विचार सुरु आहे. मात्र, एवढ्यात ते पर्याय, मार्ग सांगणे उचित ठरणार नाही.” शांतता प्रस्थापित व्हावी… भारताविरोधात कोणत्याही प्रकारच्या युद्धाच्या शक्यता इम्रान खान यांनी फेटाळल्या. ते म्हणाले, “अण्वस्त्र संपन्न असलेले दोन देश युद्ध करु शकत नाहीत. कारण त्याचा परिणाम भयंकर होतो. भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान गंभीर आहे. पाकिस्तानचं लष्कर आणि आमच्या सरकारचा उद्देश सुद्धा भारतासोबत शातंता प्रस्थापित व्हावी, हाच आहे.”

भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर.
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.