AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश

बाबरी खटल्यावर सीबीआय( CBI) चे विशेष न्यायालय बुधवारी निकाल देणार आहे. या खटल्यात एकूण 32 आरोपी आहेत (Ayodhya Babri masjid demolition)

बाबरी विध्वंसप्रकरणी बुधवारी निकाल, सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश
| Updated on: Sep 29, 2020 | 2:00 PM
Share

नवी दिल्ली : बाबरी खटल्यावर सीबीआय( CBI) चे विशेष न्यायालय बुधवारी निकाल देणार आहे. यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, कल्याण सिंह यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण 32 जण आरोपी आहेत. कोरोना महामारी लक्षात घेता यातील काही आरोपींनी निकालवेळी  प्रत्यक्ष हजर न राहण्याची परवानगी मिळण्याची विनंती केल्यास, तशी मुभाही न्यायालयाकडून मिळू शकते. (tomorrow special CBI court will rule on the Ayodhya Babri masjid demolition)

सुनावणीस प्रत्यक्ष हजर न राहण्याची परवानगी मिळू शकते

देशात कोरोना संसर्ग लक्षात घेता लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना प्रत्यक्षात हजर न राहण्याची परवानगी मिळू शकते. तशी विनंतीही आडवाणी, जोशी यांचे वकील के. के. मिश्रा न्यायालयाला करणार असल्याची माहिती आहे. प्रत्यक्ष हजर राहण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची विनंतीही ते कोर्टाला करु शकतात. तसेच शिवसेना नेते विनय कटियार, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहू शकणार नसल्याचे न्यायालयाला यापूर्वीच सांगितलं आहे. आरोपी लल्लू सिंह कोरोनाग्रस्त आहेत, तर महंत नृत्यगोपाल दास क्टारंटाईन आहेत.

27 वर्षांपासून सुरू होता खटला, 17 आरोपींचा मृत्यू

बाबरी खटल्यावर मागच्या तीन वर्षांपासून सलग सुरु असलेला युक्तीवाद 1 सप्टेंबरला संपला. न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव या खटल्यावर बुधवारी (24 सप्टेंबर) निकाल देणार आहेत. या खटल्यात भाजपा, शिवसेना, विश्व हिंदू परिषद तसेच इतर साधू-संत मिळून एकूण 49 आरोपी आहेत. यातील 17 आरोपींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 5 ऑक्टोबर 1993 ला तपास करुन या सर्व 49 आरोपींवर सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं होतं.

संबंधित बातम्या :

Saamana Editorial : “बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान”, सामनातून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा

Ayodhya Ram Mandir | बाबरी मशिदीवरुन ओवेसींचे ट्वीट, तर संजय राऊत यांच्या फोटोतून भावना

बाबरी खटल्यात मीही आरोपी, 3 वेळा कोर्टात जाऊ आलो : संजय राऊत

(tomorrow special CBI court will rule on the Ayodhya Babri masjid demolition)

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.