AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूरग्रस्त जिल्ह्यातील घरं, रस्ते आणि शाळा बांधण्यासाठी स्पेशल बजेट : पंकजा मुंडे

पडलेली घरे, वाहून गेलेले रस्ते हे बांधण्यासाठी ग्रामविकास मंत्रालय विशेष पॅकेज देईल आणि पुन्हा या गावांना नव्याने उभं केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

पूरग्रस्त जिल्ह्यातील घरं, रस्ते आणि शाळा बांधण्यासाठी स्पेशल बजेट : पंकजा मुंडे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 12, 2019 | 4:33 PM
Share

बीड : पूरग्रस्त भागातील घरे, रस्ते, शाळा, अंगणवाडी पुन्हा बांधण्यासाठी स्पेशल बजेट देऊन हा भाग पुन्हा उभा करु, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली. बीड शहरातील शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेत त्या (Pankaja Munde) बोलत होत्या. पडलेली घरे, वाहून गेलेले रस्ते हे बांधण्यासाठी ग्रामविकास मंत्रालय विशेष पॅकेज देईल आणि पुन्हा या गावांना नव्याने उभं केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन विभागाच्या वतीने आयोजित फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या कार्यशाळेचं उद्घाटन ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती. पूरग्रस्त भागात आपला जीव गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सहभाग नोंदवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.

“पूरस्थितीमुळे गेल्या आठवड्यात सर्व राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. पण आज दौरा सुरु केला आहे. कारण, बीड जिल्हाही दुष्काळी जिल्हा आहे. कोल्हापूर, सांगली या ठिकाणी महापुराने लोक त्रस्त आहेत, तर बीडमध्ये दुष्काळाने.. त्यासाठी बीडमधील विकासकामं, शेतकरी मेळावे हे आवश्यक आहे. आजपासून ते कार्यक्रम घेत आहे. या परिस्थितीत समर्पक अशा उपक्रमांनी लोकांना दिलासा मिळेल असे वाटते. तरी कृपया सर्वांनी फटाके ,बँड ,पुष्पहार हे टाळावे त्याऐवजी ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावी.. आपल्या सहकार्य व शिस्तीची अपेक्षा आहे”, असं आवाहन पंकजा मुंडेंनी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी केलं होतं.

“दुष्काळग्रस्त भागातील आणि पूरग्रस्त भागातील लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पडली पाहिजे. इथून सांगली आणि कोल्हापूरकडे प्रत्येकाने जाणे योग्य नाही. तिथल्या यंत्रणेवर तणाव येईल असं कोणतंही काम करु नये. पाणी ओसरल्यावर जास्त गरज भासणार आहे. पूरग्रस्त जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून घरे शाळा, अंगणवाडी , रस्ते, यांच्या नुकसानीचा अहवाल मागितला आहे. त्यांच्या पुनर्बांधणीसाठी स्पेशल बजेट दिलं जाईल,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

पूरग्रस्त भागातील महिलांच्या आरोग्यासाठी विशेष पाऊल

पंकजा मुंडे यांच्या खात्याकडून पूरग्रस्तांना साथीचे आजार आणि रोग, महिला आरोग्याची स्वच्छता राखण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ‘उमेद’ मार्फत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयातील महिलांसाठी विशेष पाऊल उचलण्यात आलंय. प्राथमिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकी आठ अस्मिता प्लस असलेली 45 हजार सॅनेटरी नॅपकिन्सची पॅकेट्स उपलब्ध करून पूरग्रस्त महिलांना पाठवण्यात येणार आहेत.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत