विमानात एअर हॉस्टेसचे पायलटसोबत गुटरगू, ‘स्पाईसजेट’कडून हकालपट्टी

| Updated on: Oct 31, 2019 | 12:18 PM

विमानातील पुढच्या सीटवर बसून संबंधित पायलट आणि एअर हॉस्टेस प्रेमालाप करत होते, त्यांच्याविरोधात प्रवाशाने तक्रार केली.

विमानात एअर हॉस्टेसचे पायलटसोबत गुटरगू, स्पाईसजेटकडून हकालपट्टी
Follow us on

मुंबई : विमानामध्ये प्रेमाचं प्रदर्शन करणाऱ्या पायलट आणि ऑन ड्युटी एअर हॉस्टेसला स्पाईसजेट (SpiceJet) कंपनीने जमिनीवर आणलं आहे. प्रवाशाच्या तक्रारीनंतर दोषी कर्मचाऱ्यांना कंपनीने बाहेरचा रस्ता (Air Hostess Pilot sacked) दाखवला आहे.

दिल्ली-कोलकाता विमानामध्ये गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेसंदर्भात एका प्रवाशाने कंपनीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर स्पाईसजेट कंपनीकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये वैमानिक आणि एअर हॉस्टेसला दोषी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

विमानातील पुढच्या सीटवर बसून संबंधित पायलट आणि एअर हॉस्टेस प्रेमालाप करत होते. तरुणांच्या भाषेत याला ‘पीडीए’ किंवा ‘पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन’ असं म्हटलं जातं. विमानातील एका प्रवाशाने या दोघांविरोधात कंपनीकडे तक्रार केली होती.

प्रवाशाची तक्रार काय?

दोषी आढळलेला वैमानिक हा अतिरिक्त कर्मचारी म्हणून विमानातून प्रवास करत होता, तर एअर हॉस्टेस ऑन ड्युटी होती. दोघं जण शेजार-शेजारी सीटवर खेटून बसले होते. दोघांचे काहीतरी चाळे सुरु होते. या गोष्टीचा त्रास झाल्यामुळे आपण तक्रार केली, असं प्रवाशाने म्हटलं.

सांगलीत पतीकडून खुरप्याने वार करत पत्नीची हत्या

तक्रारीची स्पाईसजेट कंपनीने गंभीर दखल घेत दोघांची चौकशी केली. यामध्ये ते दोषी आढळल्याने दोघांनाही नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. अशापद्धतीचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही असा इशारा या कारवाईच्या माध्यमातून इतर कर्मचाऱ्यांना (Air Hostess Pilot sacked) दिला आहे, असं ‘स्पाइसजेट’ने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

ड्युटीवर असतानाच अशाप्रकारचे वर्तन कंपनीच्या प्रतिष्ठेसाठी अशोभनीय आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही ही गंभीर बाब आहे, असं ‘स्पाइसजेट’ने म्हटलं आहे.