सांगलीत पतीकडून खुरप्याने वार करत पत्नीची हत्या

घरगुती वादातून पतिने पत्नीची हत्या (husband murder wife sangli) केली. ही धक्कादायक घटना काल (30 ऑक्टोबर) संध्याकाळी 6 च्या दरम्यान सांगली येथील पवार गल्लीत घडली.

सांगलीत पतीकडून खुरप्याने वार करत पत्नीची हत्या

सांगली : घरगुती वादातून पतिने पत्नीची हत्या (husband murder wife sangli) केली. ही धक्कादायक घटना काल (30 ऑक्टोबर) संध्याकाळी 6 च्या दरम्यान सांगली येथील पवार गल्लीत घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खुरप्याने गळ्यावर, तोंडावर आणि डोक्यावर वार करुन पतीची हत्या (husband murder wife sangli) करण्यात आली. सुमन पाटील (50) असं या मृत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी मलगोंडा पाटील स्वत:हून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.

घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. पतीने रागात येऊ खुरप्याने पत्नीच्या गळ्यावर, तोडांवर आणि डोक्यात वार केले. हत्येनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत पती मलगोंडा हा मृतदेहा जवळ होता. पत्नीचा मृत्यू झाल्यावर घराला कुलूप लावून. पती थेट स्वत:हून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला

या घटनेची माहिती समजताच पोलीस घटना स्थळावर पोहचले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मलगोंडा यांच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेत त्याने पत्नीवर वार करत हत्या केली.

मलगोंडा यांनी पत्नीची हत्या केली. हे शेजारी राहणाऱ्या कोणाला समजून नये म्हणून त्यांनी हत्येनंतर घराला कुलूप लावला. मलगोंडा पाटील हे एक शेतमजूर म्हणून काम करतात. पोलीस सध्या या हत्येचा अधिक तपास करत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *