लालपरीची स्वच्छतेची पंचसूत्री, आता एसटीतून करा हायजेनिक प्रवास !

रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल, बसस्थानक आणि परिसर स्वच्छ तसेच टापटीप असेल. याबरोबरच प्रत्येक बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ आणि निर्जंतुक असतील, यावर भर दिला जात आहे.

लालपरीची स्वच्छतेची पंचसूत्री, आता एसटीतून करा हायजेनिक प्रवास !
lalpariImage Credit source: lalpari
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 4:04 PM

अतुल कांबळे,TV9 मराठी, मुंबई :  एसटीच्या प्रवासाला नवीन पिढी नाक मुरडत असते. त्यामुळे नव्या पिढीलाही एसटी आपलीसी वाटवी यासाठी एसटी आता टापटीप आणि हायजेनिक होणार आहे. प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने कंबर कसली आहे.

बसेसच्या स्वच्छतेसाठी पंचसूत्रीचा वापर करण्यात येणार आहे. यात 1) बसेसची अंतर्बाह्य सखोल स्वच्छता, 2) बसच्या खिडक्या सरकत्या व पारदर्शक ठेवणे, खराब खिडक्या त्वरित बदलून घेणे, 3) गळक्या बसेस मार्गस्थ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. 4) बसमधील आसने सुस्थितीत असतील याची दक्षता घ्यावी, तसेच फाटलेल्या सीट तातडीने दुरुस्ती करून घ्याव्यात, 5) बसचा अंतर बाह्य रंग उडाला असल्यास रंगरंगोटी करून घ्यावी अशा  सूचनांचा समावेश आहे.

एसटी महामंडळाच्या संचालक महामंडळाची 302 वी बैठक नूकतीच पार पडली. एसटीची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाने बसेसची स्वच्छता राखावी, बसस्थानके टापटीप ठेवावीत तसेच स्वच्छतागृहे स्वच्छ राखावीत असे आदेश मुख्यमंत्र्यांंनी दिले आहेत. त्यानुसार उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

या बैठकीत बसेस, बसस्थानक व परिसर तसेच प्रसाधनगृहे स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्वच्छतेचे आगारानूसार नियोजन करण्यात येत असून, जिथे महामंडळाचे ‘स्वच्छक’ नाहीत तेथे स्थानिक पातळीवर आवश्यकतेनूसार कंत्राटी ‘स्वच्छक’ नेमण्यात येणार आहे.

आवश्यकतेनूसार प्रसंगी निविदा प्रक्रिया राबवून विभागीय स्तरावर स्वच्छता संस्था नेमण्यात याव्यात. तसेच ज्या आगारात स्वयंचलित बस धुलाई यंत्र नाहीत, तेथे नव्याने धुलाई यंत्र घेण्यात यावे असे आदेश उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिले आहेत.

बसेस, बसस्थानक आणि परिसर, प्रसाधनगृहे स्वच्छ राखण्याची प्रशासनाची असली तरी बसमध्ये आणि बसस्थानकावर स्वच्छता राखणे, इतरत्र कचरा न टाकणे यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी एसटी महामंडळ ‘स्वच्छतादूत’ नेमणार आहे. यासाठी कोणता अभिनेता घेतला जाणार आहे, याबद्दल उत्सुकता राबविली जात आहे.

या स्वच्छतादूतामार्फत प्रवासी जनताजनार्दनाचे स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाने भित्तीपत्रके, सूचना, सुभाषिते, उद्घोषणा आदींचा प्रभावी वापर करून एसटी कर्मचारी व प्रवासी यांच्यामध्ये स्वच्छतेबध्दल जागृती घडविण्याचा संकल्प साेडला आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.