थंडी असून पंखा का चालू केला? शिक्षकाची विद्यार्थ्याला जबर मारहाण
पालघर : पालघर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आलीय. पंखा चालू केला, या क्षुल्लक कारणावरुन शिक्षकाने विद्यार्थ्याल बेदम मारहाण केली असून, या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या डोळ्याला आणि गालाला जबर मार लागला आहे. गणेश मोरेश्वर लोहार असे विद्यार्थ्याचे नाव असून, महेश राऊत असे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शाळेतील छतावरील पंखा लावण्याच्या क्षुल्लक कारणावरुन नववी इयत्तेतील विद्यार्थ्याला […]

पालघर : पालघर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आलीय. पंखा चालू केला, या क्षुल्लक कारणावरुन शिक्षकाने विद्यार्थ्याल बेदम मारहाण केली असून, या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या डोळ्याला आणि गालाला जबर मार लागला आहे. गणेश मोरेश्वर लोहार असे विद्यार्थ्याचे नाव असून, महेश राऊत असे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
शाळेतील छतावरील पंखा लावण्याच्या क्षुल्लक कारणावरुन नववी इयत्तेतील विद्यार्थ्याला शिक्षकाने जबर मारहाण केली आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला. शिक्षक महेश राऊत याच्याविरोधात केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय घडली?
पालघरमधील सफाळे- वेढी येथील गणेश मोरेश्वर लोहार हा आदिवासी समाजातील मुलगा लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी विद्यालयात इयत्ता नववीत शिकतो. 24 डिसेंबर रोजी सकाळी वर्ग भरल्यानंतर वर्गात पंखा कुणी लावला, याचा जाब महेश राऊत या शिक्षकाने विचारला. सरांचा चढलेला पारा पाहता एकही विद्यार्थी पुढे येईना. अनेकवेळा विचारुनही कुणी उत्तर देत नसल्याने संतप्त झालेल्या महेश राऊत या शिक्षकाने लाईट बोर्डाच्या खाली बसलेल्या गणेश लोहारला समोर बोलावले. त्याला याबाबत जाब विचारल्यानंतर मी पंखा लावला नसल्याचे सांगूनही शिक्षकाने गणेशला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत गणेशचा उजवा डोळा सुजून पूर्ण लाल-काळा पडला.
महेश राऊत हा निर्दयी शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने गणेशला वर्गाबाहेर खेचत नेले आणि पुन्हा कानाखाली मारण्यास सुरुवात केली. गणेशला प्रचंड दुखापत झाली असून, त्याला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
आणखी धक्कादायक म्हणजे, मारहाण केल्याचे कुणालाही न सांगण्यासाठी सुद्धा महेश राऊत याने विद्यार्थ्याला दम भरला.
