मंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य

उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात प्रेयसीचं अन्य व्यक्तीशी लग्न ठरल्यानं प्रियकराने थेट मंदिरातून फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

मंदिरात फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या, प्रेयसीचं लग्न ठरल्यानं कृत्य
Follow us
| Updated on: Jul 22, 2019 | 11:28 AM

लखनौ : उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात प्रेयसीचं अन्य व्यक्तीशी लग्न ठरल्यानं प्रियकराने थेट मंदिरातून फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रायभा गावातील मंदिरात शनिवारी (20 जुलै) झालेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली. श्याम सीकरवार उर्फ राज असे युवकाचे नाव आहे. त्याने 4 पानांची ‘सुसाईड नोट’ लिहिली आहे. यात त्याने आत्महत्या करत असल्याने आपल्या कुटुंबीयांची माफी मागितली. तसेच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली.

22 वर्षीय युवकाने आग्रा येथील एका मंदिरात आत्महत्या केली. तसेच याचं फेसबुक लाईव्ह देखील केलं. विशेष म्हणजे या तरुणाने आपण आत्महत्या करत असल्याची माहिती आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांनाही दिली होती. तरुण आत्महत्या करत असताना त्याचे मित्र फेसबुकवर हा सर्व प्रकार पाहत होते. यानंतर स्थानिक लोकांनी मंदिरात पाहिले असता त्यांना त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला.

संबंधित युवक मागील काही काळापासून ‘डिप्रेशन’मध्ये होता. याचमुळे त्याला आपली नोकरी देखील गमवावी लागली होती. त्याने आत्महत्या करताना लिहिलेल्या चिट्ठीत म्हटले, “मला तिची खूप आठवण येत आहे. तिच्याशिवाय मी राहू शकत नाही. तिचं दुसरं कुणाशी लग्न होत आहे हे मला अजिबात सहन होत नाही. तिला गमावण्याच्या विचाराने मी प्रचंड तणावात आहे. त्यामुळे माझी नोकरीही गेली.” तो गुरुग्राम येथील एका कारखान्यात काम करत होता.

श्यामने 4 मिनिटांच्या व्हिडीओत पोलिसांना कुणाही विरोधात कारवाई न करण्याचे आवाहन केलं आहे. यात त्याने आपल्या कुटुंबीयांना मृत्यूनंतर मृतदेहाचे काही फोटो आपल्या फेसबुकवर टाकण्यास सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी त्याचं फेसबुक अकाऊंट बंद केलं आहे. अचनेराचे पोलीस अधिकारी अजय कौशल यांनी सांगितलं, ‘पीडित तरुणाचा मृतदेह मंदिरात लटकलेल्या अवस्थेत होता. तपासादरम्यान, तरुण प्रेयसीचं दुसऱ्या मुलासोबत लग्न होणार होतं म्हणून डिप्रेशनमध्ये होता. त्यामुळे तो बेरोजगारही झाल्याचे समजले आहे. आम्ही शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला आहे.”

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.