AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?

दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?

| Updated on: Jul 29, 2026 | 10:34 AM
Share

दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी ही भेट विकासकामे आणि विविध प्रलंबित विषयांबाबत झालेली सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. या भेटीला कोणताही राजकीय संदर्भ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना स्पष्टपणे फेटाळले होते. तरीही गेल्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय भेटीगाठी आणि वाढलेल्या हालचालींमुळे या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे.

दरम्यान, सुनील तटकरे यांच्या पंतप्रधान मोदी यांच्या भेटीमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवे राजकीय संकेत मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 29, 2026 10:34 AM

Follow Us