सनी देओलच्या मुलाचा मेट्रोतून प्रवास, व्हिडीओ व्हायरल

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करत आहे. तो अंधेरी ते घाटकोपर मार्गावर प्रवास करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो बसलेला आहे आणि आपल्या फोनवर सर्फिंग करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्याचा एक फोटोही समोर आला […]

सनी देओलच्या मुलाचा मेट्रोतून प्रवास, व्हिडीओ व्हायरल
Follow us

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करत आहे. तो अंधेरी ते घाटकोपर मार्गावर प्रवास करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो बसलेला आहे आणि आपल्या फोनवर सर्फिंग करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्याचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका व्यक्तीसोबत बसलेला आहे आणि त्यांच्याकडे पाहून हसताना दिसत आहे.

करण देओल मेट्रोने आपला डेब्यू चित्रपट ‘पल पल दिल के पास’च्या सेटवर जात होता. सोशल मीडियावर करणच्या स्वभावाबद्दल नेहमीच चर्चा सुरु असते. हा फोटो समोर आल्याने इंटरनेटरवर युजर्स मोठया संख्येने व्हिडीओला लाईक करत आहेत. करणच्या लूक्सने चाहत्यांना त्याने आकर्षित केलं आहे. तो आपल्या वडिलांप्रमाणे हँडसम दिसत आहे. व्हिडीओमध्ये तो ब्लॅक टी-शर्ट आणि क्रीम कलरच्या पँटमध्ये दिसत आहे.

व्हिडीओ :

View this post on Instagram

#putra #SunnyDeol #KaranDeol #mulai #syuting #film #debutnya #PalPalDilKePaas Photo&video: @realbollywoodhungama

A post shared by Nor Anifah (@seputar_bollywood) on

त्याच्या फोटोवर कंमेट करताना एका युजर्सने लिहिलं आहे की, तू तुझ्या वडील आणि आजोबांसारखा हँडसम दिसत आहेस. तर अनेकांनी त्याच्या सौंदर्यावर छान कमेंट केल्या आहेत. चाहत्यांकडून त्याला बॉलिवूडचा सुपरस्टार बोलत आहेत. त्याशिवाय त्याच्या डेब्यू चित्रपटाबद्द्ल त्याला शुभेच्छा देत आहेत.

करणचा पहिला चित्रपट त्याचे वडील सनी देओल दिग्दर्शित करत आहेत. चित्रपटातील काही शूटिंग मनाली येथे करण्यात आली. हा चित्रपट एका लव्ह स्टोरीवर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात करणसाठी लीड रोलला सारा अली खानला कास्ट करणार होते. मात्र ते शक्य झालं नाही.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI