AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या बहिणीच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यास पोलिसांचा विरोध!

गुन्हा रद्द व्हावा यासाठी सुशांतच्या बहिणींनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, हा गुन्हा रद्द करण्यास पोलिसांनी विरोध केला आहे.

Sushant Singh Rajput Case | सुशांतच्या बहिणीच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यास पोलिसांचा विरोध!
| Updated on: Nov 03, 2020 | 12:14 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास (Sushant Singh Rajput Case) सुरू असून, सीबीआयसह ईडी आणि एनसीबी देखील या तपासात गुंतल्या आहेत. सुशांतचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण, हत्या की आत्महत्या या सर्व गोष्टी जगासमोर आणण्यासाठी त्याच्या बहिणी रात्रंदिवस लढत आहेत. मात्र, आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात त्याची बहिणी देखील अडकली आहे. रिया चक्रवर्ती हिने सप्टेंबरमध्ये सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल केला होता. हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी सुशांतच्या बहिणींनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, हा गुन्हा रद्द करण्यास पोलिसांनी विरोध केला आहे.(Sushant Singh Rajput Case Police oppose cancellation of case against Sushant’s sister)

सदर गुन्हा सुशांत याच्या बहिणी प्रियांका सिंह, मीतू सिंह आणि एम्सचे डॉ. तरुण कुमार यांच्या विरोधात दाखल केला गेला आहे. हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात मुंबई पोलिसांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. हे प्रतिज्ञापत्र वांद्रे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निखिल कापसे यांनी दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात प्रियांका सिंह, मीतू सिंह आणि एम्सचे डॉ. तरुण कुमार यांच्या विरोधातील हा गुन्हा रद्द करू नये, असे म्हटले आहे.

डॉक्टरी सल्ल्याशिवाय सुशांतला औषधे दिली : रिया चक्रवर्ती

या एफआयआरमध्ये असे म्हटले होते की, सुशांतच्या बहिणी कोणत्याही डॅाक्टरी सल्लाशिवाय सुशांतला औषधे देत होत्या. ज्यामुळे सुशांतच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत होता. रियाने दाखल केलेल्या एफआयआरची प्रत मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे दिली आहे. यामुळे सुशांतच्या बहिणींना अटक होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, मुंबई उच्च न्यायालयात लवकरात लवकर सुनावणी करण्याची विनंती सुशांतच्या बहिणी करत आहेत. सुशांतच्या बहिणींच्या मते, रियाने नोंदविलेल्या एफआयआरच्या संदर्भात सीबीआय त्याच्याविरूद्ध कारवाई करू शकते आणि त्यांना अटकही होऊ शकते. यामुळे प्रियंका आणि मितू यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांची सुनावणी लवकरात लवकर झाली पाहिजे, अशी विनंती त्यांनी वकिलांमार्फत केली आहे.(Sushant Singh Rajput Case Police oppose cancellation of case against Sushant’s sister)

सुशांतच्या बहिणींनी एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात दाखल केलेली याचिका रद्द करावी आणि दोन्ही बहिणींवर कारवाई करावी. दोन्ही बाजूंनी खटला चालू आहे. आता या प्रकरणी कोर्ट काय निर्णय देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

रिया चक्रवर्तीची जामिनासाठी खटपट

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 6 ते 8 सप्टेंबर या काळात एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. 8 सप्टेंबरला तिला अटक झाली. 8 सप्टेंबर रोजी रियाला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याचवेळी तिने महानगर दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज (Bail Application)केला होता, मात्र तो अर्ज कोर्टाने फेटाळला होता.रियाने 9 सप्टेंबर रोजी मुंबई सेशन कोर्टातील एनडीपीएस विशेष कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. 11 सप्टेंबर रोजी पुन्हा सेशन कोर्टाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता.

त्यानंतर रिया आणि शौविक यांनी 22 सप्टेंबरला मुंबई हायकोर्टात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यावर 23 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. पण पावसामुळे कोर्टाला सुट्टी असल्याने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली गेली.या दोघांच्या जामीन अर्जावर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. या सुनावणीत अखेर रियाचा जामीन मंजूर करण्यात आला.

(Sushant Singh Rajput Case Police oppose cancellation of case against Sushant’s sister)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.