भारतात ‘कोरोना’चा धुमाकूळ, दिल्लीत कोरोना संशयित रुग्णाची आत्महत्या

नुकतंच दिल्लीत एका कोरोना संशंयित रुग्णाने आत्महत्या केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली (Corona Virus Delhi Suspect Suicide) आहे.

भारतात 'कोरोना'चा धुमाकूळ, दिल्लीत कोरोना संशयित रुग्णाची आत्महत्या

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरस धुमाकूळ घातला (Corona Virus Delhi Suspect Suicide)  आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र नुकतंच दिल्लीत एका कोरोना संशंयित रुग्णाने आत्महत्या केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, “राजधानी दिल्लीतील सफदरजंग (Corona Virus Delhi Suspect Suicide) रुग्णालयात एका कोरोना संशयित रुग्णाने 7 व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. या रुग्णाला आज (18 मार्च) रात्री 9 च्या सुमारास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आत्महत्या केलेला हा रुग्ण सिडनीहून दिल्लीत आला होता.”

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला हा कोरोना संशंयित रुग्ण गेल्या एका वर्षांपासून सिडनीमध्ये राहतो. रात्री 9 च्या सुमारास डोकं दुखत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र अचानक रात्री 10.30 च्या सुमारास या रुग्णाने 7 व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. त्याने ही आत्महत्या नेमकी का केली? त्याला कोरोनाची लागण झाली होती का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान चीनमध्ये कोरोना व्हायरच्या हाहा:कारानंतर आता भारतातही शिरकाव केला आहे. भारतात विविध राज्यात 159 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 45 जणांना कोरोनाची लागण झाली (Corona Virus Delhi Suspect Suicide) आहे.

संबंधित बातम्या : 

भारतात 62 लॅब, 106 सॅम्पल कलेक्शन केंद्र, गुगल मॅपवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध

कोकणात ‘कोरोना’चा शिरकाव, दुबईतून रत्नागिरीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित

कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क, लखनऊमध्ये 25 वर्षीय डॉक्टरलाही कोरोनाची लागण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI