शिवसेना नेते सुरेश कलगुडेंचा ट्रेलरच्या धडकेत मृत्यू, घातपाताचा संशय

शिवसेना नेते सुरेश कलगुडेंचा ट्रेलरच्या धडकेत मृत्यू, घातपाताचा संशय

महाड (रायगड) : शिवसेनेचे रायगडमधील लढवय्ये नेते सुरेश कलगुडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. महाड एमआयडीसी परिसरात ट्रेलरने धडक दिल्याने सुरेश कलगुडे यांचा जागीच मृत्यू झाल्याची महिती मिळते आहे. मात्र, हा नक्की अपघात होता की घातपात होता, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाड एमआयडीसीतील झुआरी फर्टिलायझर येथे जेसीबी आणि ट्रेलक चालकांमध्ये वाद झाला होता. जेसीबी […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

महाड (रायगड) : शिवसेनेचे रायगडमधील लढवय्ये नेते सुरेश कलगुडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. महाड एमआयडीसी परिसरात ट्रेलरने धडक दिल्याने सुरेश कलगुडे यांचा जागीच मृत्यू झाल्याची महिती मिळते आहे. मात्र, हा नक्की अपघात होता की घातपात होता, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाड एमआयडीसीतील झुआरी फर्टिलायझर येथे जेसीबी आणि ट्रेलक चालकांमध्ये वाद झाला होता. जेसीबी कलगुडे यांच्या मालकीचा असल्याने ते वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी गेले. मात्र, त्यावेळी ट्रेलरची धडक बसून, सुरेश कलगुडे यांचा जागीच मृत्यू झाला. सुरेश कलगुडे यांचा मृत्यू हा केवळ अपघात होता की, घातपात होता, असा संशय व्यक्त केला जात आहे.

सुरेश कलगुडे यांचा मृतदेह बिरवाडी येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. शेकडोंच्या संख्येने कलगुडेंचे समर्थक बिरवाडीत जमा होण्यास सुरुवात झाली असून, तणावाची स्थितीही निर्माण झाली आहे. ट्रेलरचालकाला तात्काळ पकडावं, अशी मागणी होत आहे. मोठ्य प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सुरेश कलगुडे कोण होते?

वय वर्षे 50 असलेले सुरेश कलगुडे हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते होते. महाड भागात शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्यानंतरचे ते मोठे नेते मानले जात. आमदार भरत गोगावले जिल्हा परिषद सदस्य आणि बांधकाम सभापती असताना आमदार झाले, त्यानंतर गोगावलेंच्या जिल्हा परिषदेच्या रिक्त जागी सुरेश कलगुडे हे शिवसेनेकडून जिंकून गेले. रायगड जिल्हा परिषद सदस्य ते रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते असा त्यांचा प्रवास होता. महाडमधील बिरवाडीमधून जवळपास सात वर्षे ते रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य होते. सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करणारा नेता आणि प्रत्येत अडचणींवेळी धावून येणार नेता म्हणून सुरेश कलगुडे यांची ओळख होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें