AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कोणीही बाहुबलीने रस्त्यावर येऊन आंदोलन करुन दाखवावं”, राजू शेट्टींचा चक्काजाम आंदोलनात विरोधकांना इशारा

कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे हे दाखवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यात विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. (Swabhimani Shetkari Sanghtana  agitation against agriculture act passed by central Govt)

कोणीही बाहुबलीने रस्त्यावर येऊन आंदोलन करुन दाखवावं, राजू शेट्टींचा चक्काजाम आंदोलनात विरोधकांना इशारा
| Updated on: Nov 05, 2020 | 1:57 PM
Share

सांगली : केंद्राच्या कृषी कायद्याला होत असलेल्या विरोधाला प्रादेशिक आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे हे दाखवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यात विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बुलडाणा जिल्ह्यांमध्ये स्वाभिमानीने आंदोलन केले. केंद्रीय कृषी विधेयकांच्या विरोधात यापुढील आंदोलने दिल्लीत होतील, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. “कोणीही बाहुबलीने रस्त्यावर येऊन आंदोलन करुन दाखवावे,” असे आव्हान राजू शेट्टी यांनी विरोधकांनी दिले आहे. (Swabhimani Shetkari Sanghtana  agitation against agriculture act passed by central Govt)

कोल्हापूर- सांगली जिल्ह्याच्या हददीवरील अंकली पुलावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला असून स्वाभिमानी शेतकरी संघटना गमिनी काव्याने आंदोलन करत असल्यामुळे जयसिंगपूर पोलीस सर्वच ठिकाणी सतर्क आहेत. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे अंकली उदगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सांगली

उसाला एक रकमी एफआरपी आणि मागील वर्षीची थकित एफआरपी मिळावी, केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील लक्ष्मी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राळेरास येथील बार्शी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केलं. शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर ( एफ.आर.पी) जाहीर करावा, अशी मागणी या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमानीचे सोलापूर जिल्हाध्य पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन विजय रणदिवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आहे.

बुलडाणा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलडाणा- अजिंठा महामार्गावर देऊळघाट येथे रस्ता रोको करण्यात आला. तब्बल 2 तास चालेल्या या रास्तारोको मुळे बुलडाणा- अजिंठा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रास्तारोकोमध्ये शेतकरी विरोधी कृषी कायदे सरकारने रद्द करावे,अशी मागणी करण्यात आली.

रविकांत तुपकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन्ही गंभीर नसल्याची टीका केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मग शेतकऱ्यांच्या उद्रेकाला केंद्रा सह राज्य सरकारला सामोरे जावे लागेल , असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

संबंधित बातम्या :

ऊस शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

Raju Shetti | ऊस शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी अधिक 14 टक्के वाढ मिळालीच पाहिजे : राजू शेट्टी

(Swabhimani Shetkari Sanghtana  agitation against agriculture act passed by central Govt)

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.