AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, ‘तुम्हाला कधी कळणार…’

Divesh Medge on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केलीय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याने लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी 'स्वराज्यरक्षक संभाजी'मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, 'तुम्हाला कधी कळणार...'
दिवेश मेडगेची पोस्ट चर्चेतImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 29, 2024 | 3:14 PM
Share

अवघ्या देशाचं प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली. सामान्य लोकांपासून ते राजकीय मंडळी, शिवप्रेमी सगळेच यावर संताप व्यक्त करत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी याबाबत आवाज उठवला आहे. शिवरायांच्या पुतळ्याबाबत एवढा हलगर्जीपणा कसा होऊ शकतो?, असा सवाल महाविकास आघाडीकडून केला जात आहे. अशातच झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्यानेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

दिवेशची पोस्ट चर्चेत

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा बालकलाकार दिवेश मेडगे याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीय. यात त्याने एक पोस्टर शेअर केलंय. यात त्याने छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या समर्थकांना देत आहेत, असं हे पोस्टर आहे. यातून अत्यंत मार्मिक शब्दात शिवरायांचा पुतळा कोसळण्यावर भाष्य करण्यात आलं आहे. तुम्हाला हे कधी कळणार नाही, मी पुतळ्यात नाही…. गडकिल्ल्यांमध्ये आहे! निष्ठा ‘हिरोजींच्या’ बांधकामासारखी भक्कम असते. हे लक्षात ठेव ‘महाराष्ट्रा’, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. दिवेशने शेअर केलेली ही पोस्ट चर्चेत आहे.

नेमकं काय नेमकं?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. डिसेंबर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं होतं. पण उद्घाटनानंतर आठ महिन्यात शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यावरून सध्या महारहाष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

आंदोलनं आणि निषेध

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळताच याचे सर्वच स्तरावर पडसाद उमटले. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला घेरलं. जिथं हा पुतळा कोसळला त्या राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीने आंदोलन केलं. तर 1 सप्टेंबरला मुंबईतही आंदोलन केलं जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची व संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, असं अमोल कोल्हे म्हणाले.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं