AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Afghanistan Crisis: इस्लामिक कायदे लागू करण्यासाठी तालिबानकडून लष्करी न्यायाधिकरणाची स्थापना

तालिबान प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ट्रिब्युनलला शरियाच्या निर्णयांचा अर्थ संबोधीत करण्याचा, इस्लामिक नागरी कायद्यांशी संबंधित डिक्री देण्याचा आणि तालिबानी अधिकारी, पोलीस, लष्कर आणि गुप्तचर युनिट्सच्या सदस्यांविरुद्ध याचिका करण्याचा अधिकार असेल.

Afghanistan Crisis: इस्लामिक कायदे लागू करण्यासाठी तालिबानकडून लष्करी न्यायाधिकरणाची स्थापना
File photo
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 2:09 PM
Share

धार्मिक कायदा लागू करण्यासाठी लष्करी न्यायाधिकरणाची (military tribunal) स्थापना करण्याची घोषणा तालिबानने केली आहे. एका निवेदनात, तालिबानचे उप प्रवक्ते, इनामुल्ला समंगानी (Enamullah Samangani) यांनी बुधवारी सांगितले की, “शरिया सिस्टीम, दैवी आदेश आणि सामाजिक सुधारणा” यासाठी सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) यांच्या आदेशानुसार न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. (Interim Taliban government has announces establishment of a military tribunal to implement Islamic religious law in Afghanistan).

तालिबान प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ट्रिब्युनलला शरियाच्या निर्णयांचा अर्थ संबोधीत करण्याचा, इस्लामिक नागरी कायद्यांशी संबंधित डिक्री देण्याचा आणि तालिबानी अधिकारी, पोलीस, लष्कर आणि गुप्तचर युनिट्सच्या सदस्यांविरुद्ध याचिका करण्याचा अधिकार असेल. टाईम्स नाऊ ने हे वृत्त दिले आहे. ओबेदुल्ला नेझामी यांची न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सय्यद अघाझ आणि झाहेद अखुंदजादेह डेप्युटी म्हणून कार्यरत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

दोन दशकांच्या युद्धानंतर, अमेरिकेने ऑगस्टमध्ये आपले सैन्य माघारी पूर्ण घेतले आणि 15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानाची सत्ता काबीज केली. तालिबान-शासित सरकारने दावा केला आहे की इस्लामिक स्टेट (IS) च्या किमान 600 सदस्यांना देशभरात गेल्या तीन महिन्यांत अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी काही दहशतवादी संघटनेच्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे, असा त्यांचा दावा आहे.

हजारो लोक रोज अफगाणिस्तानच्या बाहेर पडतायेत

दरम्यान, अफगाणिस्तानातून पळून जाणारे हजारो लोक दररोज शेजारच्या इराणमध्ये आश्रय घेत आहेत. यामुळे युरोपमधील निर्वासितांच्या संकटाचा प्रश्न अधिक गडद होणार आहे. देशातील एका उच्च अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. नॉर्वेजियन रिफ्युजी कौन्सिल (NRC) चे सरचिटणीस जॅन इंग्लंड यांनी या आठवड्यात अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व इराणमधील केरमन प्रांताजवळ निर्वासितांची भेट घेतली. अफगाणिस्तानातील लोक आश्रयाच्या शोधात इराणमध्ये पळून जात राहिल्यास त्याचा युरोपवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

यापूर्वा, 1,20,000 अमेरिकन, अफगाणी आणि इतर लोकांना हवाई मार्गाने अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आले आहे. तरीही हजारो लोक रोज अफगाणिस्तानच्या बाहेर पडत आहेत. त्यापैकी बरेच जण सीमा भागात गेले आहेत आणि मदत संस्थांकडून मदत घेत आहेत. NRC नुसार, तालिबानच्या ताब्यानंतर 3,00,000 अफगाण लोक अफगाणिस्तानातून इराणमध्ये पळून गेले आहेत.

Other News

डॉक्टर, वैद्यकीय सेवांचे होणार डिजिटायझेशन; नोंदणीला सुरुवात

“1990 मध्ये अडवाणींनी रथयात्रा काढली आणि समाजात फूट पडली, जिथे गेले तिथे द्वेषाची बीजे पेरली”- दिग्विजय सिंहांचा घणाघात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.