AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टर, वैद्यकीय सेवांचे होणार डिजिटायझेशन; नोंदणीला सुरुवात

आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य मिशन अंतर्गत देशातील सर्व वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

डॉक्टर, वैद्यकीय सेवांचे होणार डिजिटायझेशन; नोंदणीला सुरुवात
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 7:31 AM
Share

नवी दिल्ली – आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य मिशन अंतर्गत देशातील सर्व वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गंत देशभरातील डॉक्टर आणि उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा यांची माहिती आता एका क्लीकवर उपलब्ध होणार आहे. या संदर्भात देशातील सर्व  सरकारी रुग्णालये आणि संबंधित सरकारी विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

डिजिटायझेशन प्रक्रियेला 27 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. या अंतर्गत केंद्र सरकारकडून एबीडीएचएम (ABDHM) नावाचे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर जाऊन आपल्या रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या आरोग्य सुविधांची नोंद करण्याचे आवाहन खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना करण्यात आले आहे.

कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर 

दरम्यान केंद्र सरकारचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मात्र तो किती यशस्वी होईल, खासगी क्षेत्रातील डॉक्टर त्याला प्रतिसाद देतील का? असा सवाल तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. आम्हाला यामध्ये येणाऱ्या अडचणींची पूर्ण कल्पना आहे. येणाऱ्या अडचणी दूर करून, खासगी क्षेत्रातील वैद्यकीय सेवांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर आम्ही भर देत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

सावरकर धार्मिक नेते नव्हते; हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी संबंध नाही, दिग्विजय सिंग यांचा भाजपावर निशाणा

“1990 मध्ये अडवाणींनी रथयात्रा काढली आणि समाजात फूट पडली, जिथे गेले तिथे द्वेषाची बीजे पेरली”- दिग्विजय सिंहांचा घणाघात

Jammu Kashmir: पुन्हा दहशतवादी हल्ला, एक नागरिक आणि पोलिस जखमी

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.