AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu Kashmir: पुन्हा दहशतवादी हल्ला, एक नागरिक आणि पोलिस जखमी

पोलीस कर्मचारी रजेवर होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 161 बटालियन कॅम्पजवळ ग्रेनेड फेकले, त्यात एक पोलिस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाला.

Jammu Kashmir: पुन्हा दहशतवादी हल्ला, एक नागरिक आणि पोलिस जखमी
Jammu kashmir File Photo
| Edited By: Devashri Bhujbal | Updated on: Nov 10, 2021 | 8:57 PM
Share

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. श्रीनगरमधील अली मस्जिद इदगाह परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला. माहितीनुसार, या हल्ल्यात एक नागरिक आणि एक पोलिस जखमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग आणि सर्वसामान्यांवर हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. (Jammu Kashmir terrorist attack) one citizen and policeman injured rise in target killing)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी रजेवर होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 161 बटालियन कॅम्पजवळ ग्रेनेड फेकले, त्यात एक पोलिस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाला. एजाझ अहमद भट (41 वर्षीय) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकाचे नाव असून तो हवाल येथील रहिवासी आहे. तर सज्जाद अहमद भट असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो नरवरा ईदगाह येथील रहिवासी आहे. दोघांनाही एसएचएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात नागरिक जखमी झाले असून पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दहशतवाद्यांचे टार्गेट किलिंग वाढले

गेल्या काही काळापासून दहशतवादी काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना केले आहे. येथे टार्गेट किलिंगचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सोमवारी पण नागरीकांना लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या श्रीनगरमधील एका भागात हा हल्ला झाला.

ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो काश्मिरी पंडित संदीप मावा यांचा कर्मचारी होता. दुकान सोडून निघून जा, असा इशारा दिल्याचे मावा यांनी सांगितले. त्याने सांगितले की मला पोलिसांकडून फोन आला होता आणि संभाव्य हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. मवाने सांगितले की, संध्याकाळी लवकर दुकान बंद केल्यानंतर त्यांचा सेल्समन गाडीत चढला. पण त्याला गोळी लागली.

काश्‍मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लष्कराने अनेक दिवसांपासून शोध मोहीम राबवली आहे. दरम्यान, केंद्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी सीआरपीएफच्या पाच अतिरिक्त कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सामान्य लोकांच्या हत्यांनंतर 25 कंपन्या आधीच जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यात आल्या आहेत.

Other News

Bangladesh Court: बांगलादेशाचे पहिले हिंदू चीफ जस्टिस सुरेंद्र कुमार सिन्हा यांना 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जिनपिंग तिसऱ्यांदा होणार राष्ट्रपती; चीनच्या विस्तारवादी धोरणाला आळा घालण्याचे आव्हान

मलाला अडकली लग्नबंधनात; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

Follow Us
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल