जिनपिंग तिसऱ्यांदा होणार राष्ट्रपती; चीनच्या विस्तारवादी धोरणाला आळा घालण्याचे आव्हान

शी जिनपिंग पुन्हा एकदा चीनचे राष्ट्रपती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रपती निवडीवर विचारमंथन करण्यासाठी सध्या चीनमध्ये सीपीसीची बैठक सुरू आहे.

जिनपिंग तिसऱ्यांदा होणार राष्ट्रपती; चीनच्या विस्तारवादी धोरणाला आळा घालण्याचे आव्हान
क्षी जिनपिंग
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 8:09 AM

नवी दिल्ली – शी जिनपिंग पुन्हा एकदा चीनचे राष्ट्रपती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रपती निवडीवर विचारमंथन करण्यासाठी सध्या चीनमध्ये सीपीसीची बैठक सुरू आहे. ही बैठक 11 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, बैठकीत पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदासाठी शी जिनपिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाची कमान सांभाळतील. माओत्से तुंग नंतर कम्युनिस्ट पार्टीमधील सर्वात शक्तीशाली नेते म्हणून जिनपिंग यांची ओळख आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी जिनपिंग हे राष्ट्रपती झाल्यास ते अजीवन चीनच्या राष्ट्रपतीपदावर राहाण्याची शक्यता आहे. 

सर्वात शक्तीशाली नेते 

सध्या बीजिंगमध्ये सीपीसीची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये पार्टीचे तीन हजारांपेक्षा अधिक सदस्य सहभागी झाले आहेत. मात्र शी जिनपिंग हे या पक्षातील सर्वाधिक शक्तीशाली नेते मानण्यात येतात. सहभागी सदस्यांची इच्छा असो अथवा नसो त्यांना शी जिनपिंग यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा द्यावाच लागणार आहे. त्यामुळे जिनपिंग हे पुन्हा एकदा चीनचे राष्ट्रपती होणार असल्याचे बोलले जात आहे. जिनपिंग पुन्हा एकदा राष्ट्रपती झाल्यास भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

विस्तारवादी भूमिकेला बळ 

शी जिनपिंग पुन्हा एकदा राष्ट्रपती झाल्यास जगातील अन्य देशांसोबतच भारताला देखील अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे जिनपिंग हे प्रचंड आक्रमक नेते असून, त्यांची महत्वकांक्षा ही विस्तारवादाची आहे. चीनच्या शेजारी असलेल्या अनेक देशांच्या जमीन बळकवण्याचा घाट सध्या चीनकडून सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये जिनपिंग राष्ट्रपती झाल्यास चीनच्या विस्तारवादी भूमिकेला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळेच सध्या गलवान खोऱ्यामध्ये अनेकवेळ भारत -चीन आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच जर जिनपिंग हे अजीवन चीनचे राष्ट्रपती बनल्यास एलएसीचा वाद  दीर्घकाळ राहाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

SpaceX: 200 दिवसांची अंतराळ मोहीम पुर्ण करून चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले

टेलर स्विफ्ट Twitter वर सर्वात प्रभावशाली व्यक्ती, पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर तर सचिनची झाली एंट्री; बघा पुर्ण यादी

Covid Vaccine: WHO नंतर 96 देशांकडून Covaxin ला मान्यता – मनसुख मांडविया

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.