Taliban Income: तालिबानची वार्षिक कमाई 1, 11, 32, 55, 00, 000 रुपयांपेक्षा जास्त, कोण हत्यार पुरवतं, पैसा कसा मिळवला जातो, संपूर्ण माहिती

| Updated on: Aug 15, 2021 | 9:12 PM

तालिबानला फक्त पाकिस्तानच नाही तर इराणकडूनही पैसा मिळतो. (Pakistan Iran helps Taliban)तालिबानच्या तुलनेत जे सरकार अफगाणिस्तानमध्ये काम करत होतं ते दुबळं होतं असं दिसतंय. कारण 2018 मध्ये अफगाणिस्तान सरकारनं 11 अरब डॉलर खर्च केले. यातला 80 टक्के पैसा हा तर परदेशी मदतीतून आलेला होता. जेव्हा तालिबाननं कुठलीही मेहनत न करता किती तरी जास्त पैसा जमा केला.

Taliban Income: तालिबानची वार्षिक कमाई 1, 11, 32, 55, 00, 000 रुपयांपेक्षा जास्त, कोण हत्यार पुरवतं, पैसा कसा मिळवला जातो, संपूर्ण माहिती
काबूलवर तालिबानचा कब्जा
Follow us on

Taliban Income Sources: अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून काढता पाय घेताच, अगदी
थोड्याच काळात तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला. गझनी, कंदहार, चराग ए शरीफसारखी
मोठी शहरं तालिबानच्या मुठीत सहज आली. आज तर त्यांनी राजधानी काबूलवरही झेंडा फडकवला. हाती
आलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती तसच उपराष्ट्रपतींनी देश सोडून पलायन केलेलं आहे.
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अनेकांना हा प्रश्न पडलाय की, तालिबानकडे एवढी ताकद कुठून आली? पैसा
कोण पुरवतं?(Taliban money) तालिबानचं उत्पन्न काय? हत्यार कोण पुरवतं? ह्या सगळ्या प्रश्नांची
उत्तरं थोडक्यात आपण पहाणार आहोत.

तालिबानचं नेमकं उत्पन्न किती आहे याबाबत ठोस अशी माहिती खुद्द तालिबानकडेही नसावी. कारण त्यांचा
कारभारच अंधेर नगरी चौपट राजा असा आहे. पण काही रिपोर्टनुसार तालिबानचं वार्षिक उत्पन्न 1 अरब डॉलर
पेक्षाही जास्त आहे. संयुक्त राष्ट्राच्या जून 2021 च्या रिपोर्टनुसार, तालिबानचा 2011 पर्यंत वार्षिक महसूल
300 मिलियन डॉलर एवढं होतं. गेल्या काही काळात त्यात मोठी वाढ झालीय. उत्पन्नाचा हा आकडा आता
1.5 बिलियन डॉलर(Taliban Afghanistan Latest News)एवढा असल्याचं सांगितलं
जातं.

taliban

तालिबानच्या उत्पन्नाचा सोर्स काय?
अफगाणिस्तानचा इतिहास हा अफूशी जोडला गेलाय. आताही तालिबानच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा सोर्स
हा नशेचा बाजारच मानला जातो. एवढच नाही तर ज्या भागात तालिबानचा कब्जा आहे, तिथं मोठा टॅक्स
वसूल केला जातो. अनेक गुन्हेगारी स्वरुपाची कामही तालिबान करतं, ज्यातून त्यांना भरपूर पैसा मिळतो.
काही रिपोर्टनुसार-अफूसारख्या मादक पदार्थांच्या तस्करीतून तालिबानला वर्षाला 460 मिलियन डॉलर
मिळतात.


नैसर्गिक संपत्तीचीही लूट
फक्त नशेच्या कारभारावरच तालिबान अवलंबून नाही. अफगाणिस्तानमध्ये जी नैसर्गिक साधनसंपत्ती
आहे त्याचीही बेशुमार लूट तालिबान करतं. खनन उद्योगातून तालिबानला गेल्या वर्षी 464 मिलियन
डॉलरची कमाई झालेली होती. (Source of Taliban Income)एवढच नाही तर तालिबानला
डोनेशनही प्रचंड मिळतं. आता तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो की, एका दहशतवादी गटाला डोनेशन कोण
देत असेल? तर यात बिनसरकारी चॅरीटेबल फाऊंडेशन नेटवर्कचा समावेश आहे. एवढच नाही तर तालिबानचे
जे श्रीमंत समर्थक आहेत, त्यांचाही भरपूर पैसा तालिबानला मिळतो.

रशियावर अमेरीकेचा आरोप
एक वेळ होती जेव्हा रशियन सैन्य अफगाणिस्तानमध्ये होतं. त्यावेळेस त्यांच्याविरोधात अमेरिकेनं तालिबानला
मदत केल्याचं मानलं जातं. रशियाचं विभाजन झालं. नंतर रशियन सैन्यही अफगाणिस्तानमधून परत गेलं.
अमेरीकेत ट्विन टॉवर्स ओसामानं उडवले. त्यानंतर अमेरीकेनं तालिबानला टार्गेट केलं. अमेरिकेचा बदला
घेण्यासाठी मग त्याच रशियानं तालिबानला मदत करायला सुरुवात केल्याचा आरोप अमेरीका करत आलीय.
व्हाईस ऑफ अमेरीकेच्या रिपोर्टनुसार, तालिबानला रशियाच हत्यार, पैसा आणि प्रशिक्षण देत आलंय. यात
किती सत्यता आहे यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. पण 2018 साली अफगाणिस्तानमधले अमेरीकेचे
तत्कालिन कमांडर जनरल जॉन निकोलसन यांनी तसा थेट आरोप केला होता. त्यांचं म्हणनं होतं की, तालिबानच्या
विरोधात अमेरीका जे प्रयत्न करतेय त्यावर रशिया पाणी टाकण्याचं काम करतोय. त्याचं कारण अफगाणिस्तानच्या
अस्थिरतेला अमेरीकेवर आरोप करता यावेत म्हणून.


पाकिस्तानचीही तालिबानला मदत
हे तर उघड सत्य समोर आलंय की पाकिस्तान तालिबानला मदत करतंय. दोन्ही देशांची मोठी सीमा आहे.
काही जाणकारांच्या माहितीनुसार-तालिबानला फक्त पाकिस्तानच नाही तर इराणकडूनही पैसा मिळतो.
(Pakistan Iran helps Taliban)तालिबानच्या तुलनेत जे सरकार अफगाणिस्तानमध्ये
काम करत होतं ते दुबळं होतं असं दिसतंय. कारण 2018 मध्ये अफगाणिस्तान सरकारनं 11 अरब डॉलर
खर्च केले. यातला 80 टक्के पैसा हा तर परदेशी मदतीतून आलेला होता. जेव्हा तालिबाननं कुठलीही मेहनत
न करता किती तरी जास्त पैसा जमा केला.

(taliban-income-talibans-annual-income-is-more-than-1-11-32-55-00-000-rupees-who-provides-weapons-how-to-get-money-complete-information)

Afghanistan: अफगाणिस्तानची राजधानी काबुलही ढासळली, राष्ट्रपतींना वाचवायला अमेरिकन हेलिकॉप्टर, पुढे काय?