TaTa Tiago Wizz लिमिटेड एडिशन लाँच, किंमत फक्त…

| Updated on: Oct 04, 2019 | 9:57 PM

सणांचा माहोल लक्षात घेता TaTa Motors ने Tiago हॅचबॅकचं नवं स्पेशल एडिशन Wizz लांच केलं आहे (TaTa Tiago Wizz Launched). Tiago Wizz या गाडीची दिल्लीमध्ये एक्स-शोरुम किंमत ही 5.40 लाख रुपये आहे.

TaTa Tiago Wizz लिमिटेड एडिशन लाँच, किंमत फक्त...
Follow us on

मुंबई : सणांचा माहोल लक्षात घेता TaTa Motors ने Tiago हॅचबॅकचं नवं स्पेशल एडिशन Wizz लांच केलं आहे (TaTa Tiago Wizz Launched). Tiago Wizz या गाडीची दिल्लीमध्ये एक्स-शोरुम किंमत ही 5.40 लाख रुपये आहे. Wizz, Tiago च्या XZ व्हेरिएंटवर आधारित आहे. याची किंमत XZ व्हेरिएंटपेक्षा 10 हजार रुपये जास्त आहे. स्टॅण्डर्ड मॉडेलच्या तुलनेत Tiago Wizz मध्ये काही बदल करण्यात आले आहेत (TaTa Tiago Wizz limited Edition).

एक्सटेरिअर आणि इंटेरिअरमध्ये बदल

Tiago Wizz टायटेनियम ग्रे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. TaTa Tiago Wizz लिमिटेड एडिशन 10 नवीन एक्सटेरिअर आणि इंटेरिअर फीचर्ससोबत बाजारात उतरवण्यात आली आहे. लिमिटेड एडिशन Tiago Wizz हॅचबॅक 1.2 लीटर, 3 सिलिंडर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन पावर्ड आहे. हे इंजिन 85PS पावर आणि 114 Nm टॉर्क जेनरेट करतं. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आले आहेत. TaTa Tiago Wizz ब्लॅक कॉन्ट्रास्ट रुफ, कॅन्यन ऑरेंज ग्रिल इन्सर्ट, हायपरस्टाईल व्हील्स, कॅन्यन ऑरेंज ORVM आणि क्रोम Wizz बॅजिंग देण्यात आलं आहे.

TaTa Tiago Wizz मध्ये खास काय?

TaTa Tiago Wizz या लिमिटेड एडिशनमध्ये कॅन्यन ऑरेंज डेको-स्टिचसोबत फुल्ल फॅब्रिक सीट्स, ग्रेनाईट ब्लॅक इनर डोअर हँडल, टायटेनिअम ग्रे गिअर शिफ्ट बेझल, टायटेनिअम ग्रे एअर व्हेंट बेझल, कॅन्यन ऑरेंज साईड आणि सेंटर एअर व्हेंट रिंग सारखे नवे इंटेरिअर फीचर्स देण्यात आले आहेत. TaTa Tiago Wizz मध्ये ऑडियो आणि फोन कंट्रोलसोबत मल्टीफंक्शन स्टिअरिंग व्हिल देण्यात आलं आहे. लिमिटेड एडिशनमध्ये 6.35 सेंटीमीटर सेगमेंटेड ड्रायव्हर इंफॉर्मेशन सिस्टिम डिस्प्ले आणि चार स्पीकर्ससोबत Harman चा ConnectNext इंफोटेनमेंट सिस्टिमही देण्यात आला आहे.

TaTa Tiago Wizz च्या सेफ्टी फीचर्सबाबत सांगायचं झालं तर, यामध्ये immobilizer, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर एअरबॅग्स, ओवरस्पीड अलर्ट, ड्रायव्हर अँड पॅसेंजर सीट बेल्ट रिमायंडर, स्पीड डिपेंडेंट ऑटो डोअर लॉक्स, फॉलो-मी-होम लॅम्प्स, रिअर पार्किंग सेन्सर, EBD सोबतच ABS आणि कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त SUV कार S-Presso लाँच, किंमत फक्त…

मारुती सुझुकीच्या ‘या’ कारच्या किंमतीत दीड लाखांची कपात

गावागावात, शहरात पोहोचलेली टाटा सुमो आता खरेदी करता येणार नाही

मारुतीच्या स्विफ्ट, ऑल्टोसह 10 गाड्यांच्या किंमतीत घट