महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे 9 महिन्यांनी उघडले, भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण

आजच्या मंगल दिनी प्रत्येक मंदिरात भक्तांना प्रवेश देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आज भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे 9 महिन्यांनी उघडले, भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण

मुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे तब्बल 9 महिन्यांनी आज महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले आहेत. राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे, प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आजच्या मंगल दिनी प्रत्येक मंदिरात भक्तांना प्रवेश देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आज भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (temple reopen in Maharashtra today)

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर तब्बल 8 महिन्यानंतर खुलं झाल्यामुळे राज्यभरातून अनेक भाविक भल्या पहाटे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणाहून भाविक सहकुटुंब दाखल झाले आहेत. आई भवानीच्या दर्शनाची आतुरता होती ती पूर्ण झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.

साई मंदिर खुलं झाल्याने भाविकांनी पहाटपासुनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. यामुळे दर्शन रांगेत भाविकांनी गर्दी दिसून येत आहे. आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर भाविकांना मंदिरात ‌जावून साईंबाबांचं दर्शन मिळत असल्याने भाविकांमध्ये‌ समाधानाचं वातावरण आहे.

बुलढाण्यात शेगांवचं गजानन महाराज मंदिर आज उघडणार नाही आहे. श्री संत गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी उद्या 17 नोव्हेंबरला मंगळवारपासून उघडणार असल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. तर दर्शनासाठी ई-पास घ्यावा लागणार असल्याची माहिती आहे,

पुण्यातही श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी आहे. आठ महिन्यांनी आज सर्वांसाठी मंदिर खुलं होणार असल्याने आनंदाचं वातावरण आहे.

इतर बातम्या – 

Special Report | मंदिरं उघडली, पण पुढे काय?

राज्यातील मंदिरं सोमवारपासून सुरु होणार, पण सप्तश्रृंगी, काळाराम आणि त्र्यंबकेश्वर मंदिबाबात अद्यापही संभ्रम!

(temple reopen in Maharashtra today)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI