दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट? पंतप्रधान मोदींची अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यासोबत बैठक

मुंबईच्या 26/11 हल्ल्याला यावर्षी बारा वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, येत्या 26 नोव्हेंबरलादेखील अतिरेकी भारतात मोठा घातपात घडवण्याचा डाव आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे (Terrorists were planning big attack on 26 November).

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट? पंतप्रधान मोदींची अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यासोबत बैठक
दहशतवादी कारवायांचा तत्काळ पर्दाफाश होणार
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 6:40 PM

नवी दिल्ली : भारतात येत्या 26 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांचा मोठा घातपात घडवण्याचा डाव असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे काल (19 नोव्हेंबर) भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार अतिरेक्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (20 नोव्हेंबर) उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर यंत्रणाचे अधिकारी उपस्थित आहेत (Terrorists were planning big attack on 26 November).

मुंबईच्या 26/11 हल्ल्याला यावर्षी बारा वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, येत्या 26 नोव्हेंबरलादेखील अतिरेकी भारतात मोठा घातपात घडवण्याचा डाव आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानंतर काल नागरोटा येथे भारतीय जवान आणि अतिरेकी आमनेसामने आले (Terrorists were planning big attack on 26 November).

नागरोटा येथे टोल नाक्याजवळ पोलीस आणि सैन्यदालाच्या जवानांनी एका ट्रकला थांबवलं. या ट्रकमध्ये चार अतिरेकी लपून बसले होते. पोलिसांनी ट्रक थांबवताच अतिरेक्यांनी पळून जण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी त्यांना बरोबर हेरलं. त्यानंतर काल सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास जवान आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरु झाली. या चकमकीत चार अतिरेकी मारले गेले. त्यांच्याजवळ मिळालेले 11 एके-47 रायफल, तीन पिस्तूल, 29 ग्रेनेड आणि इतर स्फोटक साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे.

मुंबई हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. या हल्ल्याची मुंबईकरांना आजही आठवण आली तर अंगावर शहारे येतात. लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेच्या 10 अतिरेक्यांनी संपूर्ण मुंबईत हाहा:कार माजवला होता. या हल्ल्यात 166 निरापराध लोकांचा मृत्यू झाला होता. तर 300 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. या हल्ल्यावेळी अतिरेकी समुद्रमार्गे भारतात दाखल झाले होते. या अतिरेकी हल्ल्यात मुंबई पोलीस, एटीएस आणि एनएसजीचे 11 जवान शहीद झाले होते.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही; लष्करप्रमुखांचा निर्वाणीचा इशारा

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.