Tesla India : मोठ्या प्रतीक्षेनंतर एलन मस्क यांच्या टेस्लाची भारतात एन्ट्री

अक्षय चोरगे

|

Updated on: Jan 13, 2021 | 3:01 PM

मोठ्या प्रतीक्षेनंतर एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी 'टेस्ला'ची भारतात एन्ट्री झाली आहे.

Tesla India : मोठ्या प्रतीक्षेनंतर एलन मस्क यांच्या टेस्लाची भारतात एन्ट्री
Follow us

मुंबई : अवघ्या काही दिवसांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आणि सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर आता टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. टेस्ला कंपनीने कर्नाटकमधील बंगळुरु येथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. कंपनी बंगळुरुत लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती आणि विक्री करणार आहे. कंपनीने बंगळुरुत कामाला सुरुवातदेखील केली आहे. (Tesla motors enters in India from Bengaluru)

आरओसी फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, “टेस्लाने 8 जानेवारी रोजी बेंगळुरू येथे रजिस्ट्रार ऑफ कंपनीजसह (आरओसी) त्यांच्या अधिकृत भारतीय कंपनीची नोंदणी केली आहे. नोंदणी करताना कंपनीने आरओसीकडे अधिकृत भारतीय भांडवल 15 लाख रुपये आणि एक लाख रुपये पेड-अप भांडवल भरले आहेत. सिटी सेंटरमध्ये विभव तनेजासह टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी लिमिटेड या नावाने कंपनी सुरु करण्यात आली आहे. वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फाइन्स्टाईन यां कंपनीचे संचालक असतील.

तनेजा टेस्ला इंडियाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत, तर फाइन्स्टाईन टेस्लामध्ये वरिष्ठ संचालक (ग्लोबल ट्रेड न्यू मार्केट) आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी ट्वीट केले आहे की, “टेस्ला लवकरच भारतात उत्पादन सुरु करणार आहे. त्यासाठी कंपनी बंगळुरू येथे संशोधन आणि विकास (आर अँड डी) केंद्र सुरू करीत आहे”. दरम्यान, टेस्लाला बंगळुरुत आमंत्रित करण्यासाठी कर्नाटक सरकारने जोरदार प्रयत्न केले होते.

येडियुरप्पा यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने भारताचा प्रवास सुरु झाला आहे आणि या प्रवासाचं नेतृत्व कर्नाटक करणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्ला लवकरच बंगळुरुत एका आर अँड डी युनिटसह कामाला सुरुवात करणार आहे. मी एलन मस्क यांचं भारतात आणि कर्नाटकात स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो”. भारतात उत्पादन करण्यासाठी टेस्ला कंपनी महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांसारख्या इतर राज्य सरकारांशी संपर्क साधत आहे.

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एक ट्वीट करुन टेस्लाच्या भारतातील एंट्रीबाबत माहिती दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, टेस्ला कंपनी 2021 मध्ये भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. मस्क यांनी एका ट्वीटला दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की, निश्चितपणे आमची कंपनी पुढील वर्षात भारतात प्रवेश करेल.

हेही वाचा

ना गाड्या, ना रस्ते, सौदी अरब नवं शहर उभारणार, प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची घोषणा

Renault गाड्यांवर 65 हजारांपर्यंत सूट; ट्रायबर, क्विड आणि डस्टरचा समावेश

भारतीय मार्केटमध्ये टाटाच्या ‘या’ छोट्या SUV चा धुमाकूळ, विक्रीमध्ये 21 टक्क्यांची वाढ

(Tesla motors enters in India from Bengaluru)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI