‘हटाव लुंगी’वरुन ‘ठाकरे’चे निर्माते झुकले!

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमातील ‘हटाव लुंगी’ या शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. या शब्दांमुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील, असे मत सेन्सॉर बोर्डाने नोंदवले होते. त्यामुळे या शब्दांऐवजी सिनेमाच्या निर्मात्यांनी दुसरे शब्द वापरले आहेत. ‘ठाकरे’ सिनेमात शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील ‘हटाव लुंगी’ आंदोलनाचं चित्रण आहे. सिनेमातही ‘हटाव लुंगी’ शब्द […]

'हटाव लुंगी'वरुन 'ठाकरे'चे निर्माते झुकले!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमातील ‘हटाव लुंगी’ या शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. या शब्दांमुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील, असे मत सेन्सॉर बोर्डाने नोंदवले होते. त्यामुळे या शब्दांऐवजी सिनेमाच्या निर्मात्यांनी दुसरे शब्द वापरले आहेत.

‘ठाकरे’ सिनेमात शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील ‘हटाव लुंगी’ आंदोलनाचं चित्रण आहे. सिनेमातही ‘हटाव लुंगी’ शब्द वापरण्यात आले आहे. या शब्दांमुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखवू शकतात, असा मत मांडत नोंदवत सेन्सॉर बोर्डाने निर्मांत्यांकडे आक्षेप नोंदवला होता. सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतर ‘ठाकरे’ सिनेमाच्या निर्मात्यांनी एक पाऊल मागे घेत, ‘हटाव लुंगी’ या शब्दांऐवजी ‘उठाव लुंगी’ असे शब्द वापरले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात दक्षिण भारतीयांविरोधात आंदोलन केले होते. हे आंदोलन ‘हटाव लुंगी’ या नावानेच ओळखले जाते. त्यामुळे बाळासाहेबांवरील आगामी ‘ठाकरे’ सिनेमात या आंदोलनाचं चित्रण दाखवत असताना, ‘हटाव लुंगी’ शब्दही वापरण्यात आला होता. त्यावरुन वाद सुरु झाला होता.

येत्या 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘ठाकरे’ सिनेेमाची निर्मिती शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात विशेष आकर्षण म्हणजे, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने केली आहे, तर अभिनेत्री अमृता राव हिने माँसाहेबांची भूमिका साकारली आहे.

बाळासाहेबांचा शिवसेना स्थापन करण्याआधीचा काळा आणि शिवसेना स्थापन केल्यानंतरचा काळ, असा या सिनेमात दाखवण्यात आला आहे. मात्र, सिनेमात नेमके कोणते प्रसंग आहे, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळू शकेल. हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला देशभरात 1200 ते 1300 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. विदेशातही 400 ते 500 स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित होईल.

संबंधित बातम्या :

‘ठाकरे’तील ‘हटाव लुंगी’वर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप

‘ठाकरे’ प्रदर्शित होऊ देणार नाही, संभाजी ब्रिगेड आक्रमक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.