तोफ धडाडणार, चिंगारी पेटणार; बाळासाहेबांचा ‘आवाज’ परतणार?

तोफ धडाडणार, चिंगारी पेटणार; बाळासाहेबांचा 'आवाज' परतणार?

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. ट्रेलरमधील डायलॉग पाहून प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिकाही दमदार पद्धतीने साकारली आहे. पण प्रेक्षकांना एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे बाळासाहेबांचा आवाज.. बाळासाहेबांच्या आवाजाला जी धार होती, […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. ट्रेलरमधील डायलॉग पाहून प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिकाही दमदार पद्धतीने साकारली आहे. पण प्रेक्षकांना एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे बाळासाहेबांचा आवाज..

बाळासाहेबांच्या आवाजाला जी धार होती, ती या ट्रेलरमध्ये दिसून न आल्याने प्रेक्षक कमालीचे नाराज झाले. प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांचा सिनेमातील आवाज बदलण्याचीही मागणी केली. अखेर ही मागणी निर्मात्यांच्या कानावर पडल्याचं कळतंय. या सिनेमात बाळासाहेबांचा आवाज डबिंग आर्टिस्ट चेतन सशीतल यांच्याकडून डब करुन घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे. वाचाThackeray movie trailer: ठाकरे सिनेमाचे दोन्ही ट्रेलर

सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आलेल्या भावना दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मनावर घेतल्याचं बोललं जात आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही कळवण्यात आलेलं नाही. मात्र डबिंगची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती आहे. वाचा ‘ठाकरे’ सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

भाषणाच्या सुरुवातीलाच “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो”  हे वाक्य कानावर पडताच अंगावर आजही शहारे येतात. पण ही भावना ट्रेलर पाहिल्यानंतर जाणवत नव्हती. चाहत्यांचा आवाजाच्या बाबतीत भ्रमनिरास झालेला पाहायला मिळाला.

बाळासाहेबांच्या आवाजाविषयी टीव्ही 9 ने प्रेक्षकांना प्रश्नही विचारला होता. चेतन सशीतल यांचंच नाव अनेकांनी सुचवलं होतं. अखेर याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. चेतन सशीतल यांनी बिग बी अमिताभ बच्चनसह अनेक दिग्गजांचा आवाज डब केलेला आहे. आवाजाचे जादूगार अशी त्यांची ओळख आहे.

हिंदी ट्रेलर :


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें