REVIEW : क्षणाक्षणाला अंगावर शहारे आणणारा ‘ठाकरी बाणा’

‘जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो’ हा करारी आवाज ज्यांची ओळख आहे, ज्यांच्या एका शब्दावर हजारो शिवसैनिक प्राणांची आहुती द्यायला तयार असायचे असे शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट म्हणजे ‘ठाकरे’. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती.. विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीला या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.. पण आपण […]

REVIEW : क्षणाक्षणाला अंगावर शहारे आणणारा 'ठाकरी बाणा'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

‘जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो’ हा करारी आवाज ज्यांची ओळख आहे, ज्यांच्या एका शब्दावर हजारो शिवसैनिक प्राणांची आहुती द्यायला तयार असायचे असे शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट म्हणजे ‘ठाकरे’. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती.. विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीला या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.. पण आपण काय ताकदीचा अभिनेता आहोत हे नवाजने या चित्रपटातून दाखवून दिलंय. मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये छोट्या भूमिकेत झळकलेला नवाज तर आता थेट शक्तीशाली नेत्याच्या भूमिकेत दिसलेला नवाज यात कमालीचा फरक जाणवतोय..

बाळासाहेब फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते तिथून या चित्रपटाला सुरुवात होते.. मुंबईत मराठी माणसाला काडीची किंमत दिली जात नाही. परप्रांतीयांची मुंबईतील आवक वाढत चाललीये..त्यामुळे परप्रांतीयांना पुन्हा माघारी धाडून मराठी माणसाला रोजगार मिळावून द्यायचाच या जिद्दीने पेटून उठलेल्या बाळ ठाकरेचा बाळासाहेब ठाकरे कसा बनतो या प्रेरणादायी प्रवास ठाकरे या चित्रपटात दाखवण्यात आलाय..

दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी बाळासाहेब नक्की कसे होते, त्यांचा स्वभाव, त्यांची निर्णयक्षमता आणि मराठी माणसासाठी काही तरी करुन दाखविण्याची त्यांची तळमळ उत्तम पद्धतीने मांडली आहे. मराठी अस्मिता जपण्याचा आणि मराठी माणसासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न करण्यासाठीच बाळासाहेबांनी साकारलं पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’. या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसांना रोजगार दिला.. या माध्यमातून अनेक जीवाभावाची माणसे बाळासाहेबांनी जोडली. त्यानंतर साहेबांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे दाखवत हा चित्रपट पुढे सरकतो. बाळासाहेब ठाकरे या नावाचं वलय काय होतं हे हा चित्रपट बघतांना प्रकर्षाने जाणवत राहतं. नवाजनेही साहेबांची भूमिका अक्षरक्ष: जगली आहे..त्यांची देहबोली, त्यांचं चालणं, वागणं, बोलणं, स्टाईल सगळ्या गोष्टींचा नवाजने अत्यंत बारकाईने अभ्यास केलाय. अयोध्येमधील बाबरी मशीद आणि राम मंदिर यांची सुनावणी सुरु असताना चित्रपटात फ्लॅशबॅक दाखविण्यात आला आहे. दोन्हीचा दिग्दर्शकाने उत्तम ताळमेळ साधलाय..आणिबाणीचा काळ असेल, किंवा बाळासाहेबांवरील हल्ला असेल, दहशत वाद्यांकडून साहेबांना संपवण्याचा कट रचला जाणं असेल सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. या सगळ्यावरुन बाळासाहेब नावाच्या वलयाची कल्पना येते.  राजकारण कमी आणि  समाजकारणावर भर देणारे बाळासाहेब ठाकरे आपल्या कुटुंबाकडेही विशेष लक्ष देत होते. मात्र या सगळ्यांमध्ये मीनाताई ठाकरे यांचा मोलाचा वाटा होता. या सगळ्या प्रवासात त्यांचं मॉंसाहेबांसोबत त्यांचं हळुवार उलगडत जाणारं नातंही तितक्याच कौशल्यानं अभिजीत पानसे यांनी दाखवलंय.. बाळासाहेब तुरुंगात असताना घराचा आणि मार्मिकचा गाडा त्यांनी लीलया पेलला होता..माँसाहेबांच्या भूमिकेत अमृता राव झळकलीय..तिच्या वाट्याला भूमिका जरी छोटी असली तरी मिळालेल्या संधीचं तिनं सोनं केलंय..बाळासाहेबांच्या पाठीशी वेळप्रसंगी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या मॉसाहेब अमृताने उत्तम साकारल्या आहेत.

1966 साली शिवसेनेची स्थापना केल्यानंतर ती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी दिवस-रात्र झटलेले बाळासाहेब चित्रपटात सगळ्यांना दिसतात. बाळासाहेबांच्या जीवनातील फक्त महत्त्वाचे प्रसंग चित्रपटात दाखवण्यात आल्यामुळे बऱ्याच घटना पटकन निघून जातात. शिवसेना स्थापनेआधीचा आणि स्थापनेनंतरचा संघर्ष खरंतर अजून खुलवता आला असता पण दिग्दर्शकाने सगळ्या घटना दाखवायच्या नादात बरेच प्रसंग पटापट गुंडाळले.

या सगळ्या बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं असतं तर सिनेमा अजून चांगला होऊ शकला असता…बाळासाहेब आपल्या वनलायनरसाठी ओळखले जायचे. पण या चित्रपटात त्याचीही कमतरता प्रामुख्याने जाणवते. पण बाळासाहेबांसाठी सबकुछ माफ बॉस.

नारायण राणे, छगन भुजबळ आणि गणेश नाईक एकेकाळी बाळासाहेबांचे विश्वासू होते.. मात्र काही कारणास्तव या तिघांनी शिवसेनाला रामराम ठोकला…त्यामुळे या तिघांचा चित्रपटात कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. पण कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले स्वर्गीय आनंद दिघे, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशींना मात्र सिनेमात चांगलं स्थान मिळालंय.. संदीप खरेने मनोहर जोशींची भूमिका साकारलीये..तर प्रविण तर्डे दत्ता साळवींच्या भूमिकेत दिसले आहेत..सगळ्या कलाकारांनी आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत..चित्रपटाची सिनेमाटोग्राफीही अप्रतिम असून तो काळ उत्तम उभारला आहे..

एकूणच काय तर बाळासाहेबांचा हा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर बघणं एक जबरदस्त ट्रीट आहे.. नवाजचा लाजवाब अभिनय, बाळासाहेबांचा खडतर प्रवास कसा होता, तो काळ कसा होता हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट बघायला हरकत नाही..

या चित्रपटाला ‘टीव्ही नाईन मराठी’कडून मी देतोय तीन स्टार

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.