होय ऑडिओ क्लीप माझीच! माजी मंत्री अनिल बोंडेंची माहिती, मी सत्य बोललो, नवाब मलिकांचा बोलविता धनी शरद पवार!

अमरावतीतल्या दंगलींसाठी 1,2 नोव्हेंबरपासून राष्ट्रवादीची तयारी सुरु होती, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला. आमच्याकडे या सगळ्याचे पुरावे आहेत. ते सिद्ध करणारे स्क्रीन शॉट्स आहेत, अशी माहिती अनिल बोंडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

होय ऑडिओ क्लीप माझीच! माजी मंत्री अनिल बोंडेंची माहिती, मी सत्य बोललो, नवाब मलिकांचा बोलविता धनी शरद पवार!
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 3:10 PM

अमरावतीः नवाब मलिक (Navab Malik)  यांनी आज ट्विटरवर एक ऑडिओ क्लिप सादर केली. त्यात भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांचा आवाज असल्याचं म्हटलंय. भाजपच्या काळात आतापर्यंत कधीही दंगली झाल्या नाहीत, असं वक्तव्य त्या क्लिपमध्ये करण्यात आलं होतं. अनिल बोंडे यांनीदेखील ती क्लिप माझीच असल्याचं मान्य केलंय. मात्र मी यात कोणत्याही प्रकारचं खोटं बोललेलो नाही. जे सत्य आहे तेच सांगितलं, असं स्पष्टीकरणही अनिल बोंडे यांनी दिलं. मलिक यांच्या या कारस्थानामागे (Riots in Amaravati) शरद पवार असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.

मलिक यांनी ट्विटरवर टाकली होती ऑडिओ क्लिप

नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विटरवर एक ऑडिओ क्लिप टाकली होती. त्यात अनिल बोंडे किती खोटं बोलत आहे, हे दर्शवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. झूठ बोले कौआ काटे.. असं म्हणत अनिल बोंडेंनी त्या क्लिपमध्ये केलेले दावे खोटे आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या प्रकारावर अनिल बोंडे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय.

‘नवाब मलिकांचे बोलविता धनी शरद पवार’

नवाब मलिक सतत माध्यमांसमोर येऊन बोलतात, त्यांच्या पाठिशी राष्ट्रवादी, शरद पवार आहेत, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं. आज विदर्भात एवढी अस्वस्थता आहे. या हिंसक कारवायांसाठी मी पैसे वाटले, दारू वाटली असा आरोप मलिक यांनी केला आहे. मात्र सगळ्यात आधी 12 नोव्हेंबर रोजी ज्या घटना घडल्या, त्या कुणी घडवून आणल्या, असा जाब अनिल बोंडे यांनी विचारलाय. पहिल्या दिवशीचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटले. अशा घटना घडल्यानंतर लोकांना एकत्र करावं लागत नाही तर ते स्वतः एकत्र येतात, असं अनिल बोंडे म्हणाले.

‘आमच्याकडेही स्क्रीन शॉट्स, पोलिसांना पुरवणार’

अमरावतीतल्या दंगलींसाठी 1,2 नोव्हेंबरपासून राष्ट्रवादीची तयारी सुरु होती, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला. आमच्याकडे या सगळ्याचे पुरावे आहेत. ते सिद्ध करणारे स्क्रीन शॉट्स आहेत. अमरावतीचे पोलीस दबावाखाली काम करत असून त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सध्या अमरावतीत इंटरनेटसेवा बंद असल्यामुळे ते स्क्रीनशॉट्स पोलिसांना देता येत नाहीयेत, अशी माहिती अनिल बोंडे यांनी दिली. या शहरात रझा अकादमीच नाही, त्यांचे सेक्रेटरी कोण आहेत, हेही पोलिसांना माहिती नाही, तर आता आम्ही त्यांना शोधून देणार का, असा सवालही अनिल बोंडे यांनी केलाय.

इतर बातम्या-

पहिली बायको सोडून गेली, दुसरीचा गळा दाबून खून, लग्नानंतर साडेचार महिन्यांतच असं काय घडलं?

भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची; राज्यातील हिंसेवरून पवारांचा हल्लाबोल

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.