चीनमध्ये निसर्गाचं अचंबित करणारं रूप, एकाच वेळी 3 सूर्य दिसल्याने जगभरात चर्चा

अनेकदा निसर्ग आपली थक्क करुन टाकणारी रुपं दाखवत असतो. असंच निसर्गाचं दुर्मीळ रुप चीनच्या मोहे (Mohe) शहरात पाहायला मिळालं.

चीनमध्ये निसर्गाचं अचंबित करणारं रूप, एकाच वेळी 3 सूर्य दिसल्याने जगभरात चर्चा

बीजिंग : अनेकदा निसर्ग आपली थक्क करुन टाकणारी रुपं दाखवत असतो. असंच निसर्गाचं दुर्मीळ रुप चीनच्या मोहे (Mohe) शहरात पाहायला मिळालं. या ठिकाणी शनिवारी (17 ऑक्टोबर) लोक सकाळी उठले तर त्यांना आकाशात चक्क 3 सूर्य पाहायला मिळाले. हे पाहून तेथील लोक चकित झाले. ही दुर्मीळ घटना जवळपास 3 तास आकाशात पाहायला मिळाली. त्यामुळे अनेकांनी ही मनमोहक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहेत (Three Suns appear in china due to rare phenomenon of Sun Dogs Video viral).

चीनच्या मोहे शहरात एकाच वेळी दिसलेल्या 3 सूर्यांपैकी 2 मात्र खरे नव्हते. ‘सन डॉग’ (Sun Dogs) या घटनेमुळे एका सूर्याऐवजी 3 सूर्य पाहायला मिळत होते. हा एक प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच दृष्टीभ्रम आहे. जेव्हा आकाशात खूप उंचीवर सूर्य किरणं बर्फामधून जातात तेव्हा एका सूर्याच्या ठिकाणी अधिक सूर्यांचा भास होतो. मूळ सर्याच्या अवतीभवती दिसणाऱ्या या चमकणाऱ्या स्पॉट्सला फँटम सन (Phantom Sun) म्हणतात.

चीनच्या आकाशात हा दुर्मीळ नैसर्गिक योग लोकांनी जवळपास 3 तास पाहिला. सकाळी 6:30 ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान हे 3 सूर्य पाहता आले. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. अनेक लोकांनी ही दुर्मीळ घटना आपल्या फोनमध्ये कैद करुन इतरांसोबत शेअर केली आहे. मागील काही वर्षांमधील हा सर्वात काळ पाहता आलेला सन डॉग मानला जात आहे. याचे व्हिडीओ आणि फोटो पाहून जगभरातील अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

हेही वाचा :

चीनचा भयानक प्लॅन! अमेरिकन नागरिकांचे डीएनए आणि मेडिकल डाटाही गोळा करण्याचं काम सुरु?

चीनच्या प्रभावात असलेला इराण भारताला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

आर्मेनिया आणि अजरबेजानच्या युद्धात 20 दिवसात 52,000 जणांचे मृत्यू, कुणाचं किती नुकसान?

Three Suns appear in china due to rare phenomenon of Sun Dogs Video viral

Published On - 7:17 pm, Sun, 18 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI