AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात गरिबी येण्याचे कारण ठरू शकतात या वस्तू, नवीन वर्ष सुरू होण्याआधीच टाका घराबाहेर

आपले घर हे कुटुंबाच्या आनंदाचे समृद्धीचे आणि कल्याणाचे स्त्रोत आहे. अनेक लोक वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घराचे बांधकाम करतात आणि त्यानुसार ते घरातील वस्तू देखील ठेवतात. पण घरात नुसत्या वस्तू ठेवून उपयोग नसतो तर घरात कोणत्या गोष्टी शुभ किंवा अशुभ आहेत याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही या गोष्टी जाणून घ्या. ज्यामुळे नवीन वर्षात तुमच्या घरात सुख समृद्धी येईल.

घरात गरिबी येण्याचे कारण ठरू शकतात या वस्तू, नवीन वर्ष सुरू होण्याआधीच टाका घराबाहेर
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Dec 26, 2024 | 8:10 PM
Share

आता काही दिवसातच नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यावर अनेक जण काही संकल्प करतात. तर काहीजण नवीन वर्षाचे स्वागत म्हणून पार्टी करतात. नवीन वर्षात तुम्ही तुमच्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही बदल करू शकता. हे बदल केल्यामुळे तुमच्या घरातले दुःख, दारिद्र्य संपुष्टात येऊन घरात सुख-समृद्धी येईल. नवीन वर्ष सुरू होताच लोक अनेक प्रकारच्या योजना आखतात. ज्या गोष्टी गेल्या वर्षभरात पूर्ण होऊ शकल्या नाही त्या नवीन वर्षात पूर्ण करण्याचा अनेक जण संकल्प करत असतात. पण संकल्प करून देखील काही फायदा होत नाही त्यासाठी काही बदल करणे आवश्यक आहेत. घरात सुख समृद्धी येण्यासाठी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी या गोष्टी तुम्ही आत्ताच खरा बाहेर काढून टाकाव्या लागतील

या वस्तू आत्ताच टाका घराबाहेर

सुकलेली झाडे

अनेक जण घरामध्ये झाडे लावतात किंवा छोटी मोठी झाडे घरामध्ये सजावटीसाठी ठेवतात. पण कधी कधीही झाडे लक्ष न दिल्यामुळे सुकून जातात. तुमच्या घरातही सुकलेली झाडे असतील तर ती लगेच काढून टाका. घरामध्ये सुकलेली झाडे किंवा रोपे ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे कुटुंबात आनंदा ऐवजी अशांतता निर्माण होऊ शकते.

बंद पडलेले घड्याळ

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरात तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे जीवनात वाईट वेळ येऊ शकते आणि एखाद्याला गरिबीचा सामना देखील करावा लागू शकतो. त्यामुळे घरात वापरात न येणारे घड्याळ असेल तर ते आत्ताच घराबाहेर टाकून द्या.

तुटलेले फर्निचर

घरामध्ये तुटलेले फर्निचर ठेवणे अशुभ मानले जाते. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या घरातही जुने फर्निचर असेल तर ते आत्ताच टाकून द्या. घरात तुटलेले फर्निचर ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येते.

तुटलेला आरसा

घरामध्ये तुटलेला आरसा कधीही ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेला आरसा ठेवल्यामुळे दुःख दारिद्र्य येते. त्यामुळे नवीन वर्ष येण्याआधी तुमच्याही घरात तुटलेला आरसा असेल तर तो आत्ताच टाकून द्या.

विस्कटलेले घर

घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील वस्तू वेळीच जागच्या जागी ठेवा. यामुळे घराचे सौंदर्य तर वाढतेच पण त्यासोबतच कुटुंबातच सुख शांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू विखुरलेल्या असतील तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वच्छ आणि व्यवस्थित घरामध्ये आनंद आणि सुख समृद्धी येते.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार