आर्मेनिया आणि अजरबेजानच्या युद्धात 20 दिवसात 52,000 जणांचे मृत्यू, कुणाचं किती नुकसान?

आर्मेनिया आणि अजरबेजानच्या (Azerbaijan) युद्धात 20 दिवसांमध्ये आतापर्यंत 52 हजारपेक्षा अधिक लोकांना मृत्यू झाला आहे.

आर्मेनिया आणि अजरबेजानच्या युद्धात 20 दिवसात 52,000 जणांचे मृत्यू, कुणाचं किती नुकसान?
Follow us
| Updated on: Oct 17, 2020 | 4:10 PM

येरेव्हान : आर्मेनिया (Armenia) आणि अजरबेजानच्या (Azerbaijan) युद्धात 20 दिवसांमध्ये आतापर्यंत 52 हजारपेक्षा अधिक लोकांना मृत्यू झाला आहे. 20 दिवस उलटूनही हे युद्ध थांबण्याचं कोणतंही स्पष्ट चिन्ह दिसत नाहीये. आर्मेनियाने आतापर्यंत 52 हजार बळी घेतलेल्या या युद्धाची परिस्थिती जगासमोर ठेवली आहे. नागोर्नो काराबाख (Nagorno Karbakh) येथून आलेल्या माहितीतून अजरबेजान आणि तुर्कीच्या विध्वंसाचं चित्र स्पष्ट होतं (Total deaths in Azerbaijan and Armenia war).

आर्मेनियाचे सैन्य सातत्याने रॉकेट हल्ला करत आहे. त्यांच्या टारगेटवर अजरबेजान-तुर्की यांचं सैन्य आणि गांजा शहर आहे. सैन्यासोबतच नागरी वसाहत असलेल्या शहरांवरही हल्ले होत आहेत. या भागात घराची छपरं उद्ध्वस्त झाली आहेत, तर भिंती कोसळल्या आहेत. आर्मेनिया देश एकटा अजरबेजान आणि तुर्की सैन्याच्या विरोधात नागोर्नो काराबाखच्या युद्ध मैदानात अडून आहे. आर्मेनियाला रशियाच्या हत्यारांची मदत आहे. युद्धाच्या या 20 दिवसांमध्ये दोन्ही बाजूचं प्रचंड नुकसान झालं आहे.

अजरबेजान देशाचं किती नुकसान?

आर्मेनियाने अजरबेजान देशाचे 505 किलर ड्रोन उद्ध्वस्त केले आहेत. याशिवाय आर्मेनियाने अजरबेजानचे 86 हेलिकॉप्टर आणि 38 एअरक्राफ्ट देखील उद्ध्वस्त केले. इतकंच नाही तर 513 विशेष सुरक्षा असलेल्या गाड्या आणि 83 रॉकेट लॉन्चर देखील नेस्तनाबूत केले आहेत. वॉर झोनमध्ये अजरबेजानचे 14700 जवान मारले केले आहेत. यात तुर्की सैना आणि सीरियाच्या दहशतवाद्यांची मोजदाद नाहीये. दुसरीकडे या युद्धात सामान्य नागरिकांचेही बळी गेलेत. आतापर्यंत 20 दिवसात या युद्धात 8 हजार 230 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.

मरणाऱ्यांचा हा आकडा प्रत्येक तासाला वाढतच चालला आहे. आर्मेनियाच्या हल्ल्याला अजरबेजानकडूनही आक्रमक प्रत्युत्तर दिलं जात आहे. अजरबेजान आर्मेनियापेक्षा अधिक क्षमतेने मारा करत आहे. रणगाडे सातत्याने आग ओकत आहेत. इस्त्राईलवरुन आलेले ‘किलर ड्रोन’ देखील जोरदार हल्ले करत विध्वंस करत आहेत. सीमा आणि शहर दोन्ही ठिकाणी सातत्याने मिसाईलचा मारा होत आहे. आर्मेनियाच्या प्रभावाखाली असलेल्या स्टेपनकर्टचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.

आर्मेनियाचं किती नुकसान

या युद्धात सध्यातरी आर्मेनियापेक्षा अजरबेजानची जास्त पकड आहे. तुर्की आणि अजरबेजान या दोन्ही देशांच्या सैन्याने मिळून आर्मीनियाचे आतापर्यंत 1080 रणगाडे उद्ध्वस्त केले आहेत. याशिवाय 789 आर्टिलरी आणि 589 विशेष सुरक्षा असलेल्या गाड्या देखील यात उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. अजरबेजानने आर्मीनियाच्या 96 एअर डिफेन्स सिस्टीम निकामी केल्या आहेत. आर्मीनियाचे 715 ड्रोन देखील खाली पाडण्यात आले.

आर्मेनियाचे 92 हेलिकॉप्टर अजरबेजानने उद्ध्वस्त केले आहेत. या युद्धात आतापर्यंत आर्मेनियाचे 17 हजार 800 जवान मृत्यूमुखी पडले आहेत. याशिवाय 10 हजार सामान्य नागरिकांचाही या युद्धाने बळी घेतला आहे. आर्मेनियावर हल्ला करण्यासाठी अजरबेजानला तुर्कीची देखील साथ मिळाली आहे. याशिवाय पाकिस्तानी सैनिक आणि सिरीयाचे दहशतवादी देखील त्यांना साथ देत आहेत. दुसरीकडे आर्मेनियाला आता रशिया, फ्रान्स-सर्बिया यांची साथ मिळाली आहे. याशिवाय अमेरिकेने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. हे युद्ध अधिकच विध्वंसक होत आहे.

संबंधित बातम्या :

आर्मानिया आणि अजरबैजान युद्धाचं कारण काय? भारत कुणाच्या बाजूने?

इराणच्या इशाऱ्याने विध्वंसक युद्धाची शक्यता, आर्मेनिया आणि अजरबैजान देशांमध्ये हजारो निष्पापांचे बळी

चीन-अमेरिकेतली तणातणी वाढली, अमेरिकेचे 24 तासात दोन निर्णय, चीनच्या चिंतेत वाढ

Total deaths in Azerbaijan and Armenia war and other loss of both countries

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.